टोमॅटो लागवडीसाठी हंगामानुसार कोणत्या रंगाच्या मल्चिंग पेपरची निवड करावी?
Farmspot AgroShare
हंगामानुसार मल्चिंग पेपरची निवड करत असताना त्या हंगामात असणारे तापमान लक्षात घेणे गरजेचे आहे.
✅मल्चिंग पेपरची जाडीवरून निवड
▸ मल्चिंग पेपर हे वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या जाडीचे व वेगवेगळ्या आकाराचे असतात.
▸ मल्चिंग पेपरच्या जाडीच्या बाबतीत विचार करायचे झाल्यास जर तुम्ही फक्त टोमॅटो पिकासाठी निवडत असाल तर तुम्ही 20 micron च्या मल्चिंग चा वापर करू शकता.
▸ जर तुम्ही टोमॅटो नंतर त्याच मल्चिंग वर दुसरे पीक घेणार असाल तर तुम्ही 25 किंवा 30 micron चा मल्चिंग पेपर वापरायला हवा.
▸ आपण टोमॅटो लागवड करत असताना दोन ओळींमध्ये अंतर हे 4.5 फूट, 5 फूट, 5.5 फूट ठेवत असतो त्यामुळे आपण 4 फूट रुंदीचा मल्चिंग पेपरची निवड करावी.
✅पावसाळी हंगाम
▸ जर आपण टोमॅटो हे पावसाळी व हिवाळी हंगामात लावत असू तर तुम्ही Silver black रंगाच्या मल्चिंग पेपरची निवड करावी.
✅उन्हाळी व हिवाळी हंगाम
▸ जर तुम्ही उन्हाळी लागवडीसाठी मल्चिंग वापरत असाल तर तुम्ही white black मल्चिंग चा वापर करावा. ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये मल्चिंगच्या आतमध्ये जास्त वाफ तयार होत नाही व त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात रोपाची मर होत नाही.