टोमॅटो रोप लागवडीनंतर पहिली बांधणी कधी करावी व काय काळजी घ्यावी?
Farmspot AgroShare
टोमॅटो रोप लागवडीनंतर रोपांची पहिली बांधणी कधी करावी हे ठरवण्यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करावा.
✅टोमॅटो रोप लागवडीनंतर रोपांची वाढीची अवस्था ही 15 दिवसांनी सुरू होते. या अवस्थेत रोपांची उंची लवकर वाढते व नवीन फुटवे ही निघतात. या अवस्थेत म्हणजे 15 ते 30 दिवसांच्या दरम्यान ज्यावेळेस रोपांची उंची ही 28 ते 32 Cm च्या दरम्यान असेल तेव्हा रोपांना आधार देण्यासाठी बांधणी करावी.
बांधणी कशासाठी करावी
✅टोमॅटो रोप झुडुप प्रकारातील आहे.ज्यावेळेस याची रोप वाढीची अवस्था चालू असते या अवस्थेत नवीन फुटवे निघतात रोपांची उंची वाढते, ज्यावेळेस रोपांची उंची 25 Cm पेक्षा जास्त होते तेव्हा वारे,हवा यामुळे रोपे एका बाजूला कलंडतात व त्यांची पाने मातीला चिटकतात त्यामुळे पानांवर त्या मातीद्वारे बुरशीचा प्रादुर्भाव होतो.तसेच काही ठिकाणी खोड पिचकते व त्या जखमेतून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.या कारणांमुळे रोपांची बांधणी करून घ्यावी.
बांधणी कशाप्रकारे करावी?
✅बांधणी करताना अगोदर बांबूचे स्ट्रक्चर उभे करावे.किंवा काही शेतकऱ्यांचे जुने द्राक्ष बागेचे लोखंडी स्ट्रक्चर असते, त्यानंतर रोपांना शेंड्यापासून खाली पहिली फांदी जिथून निघते तिथे म्हणजेच सरासरी 7 Cm ते 10 Cm मुख्य खोडाला मारावी व नंतर ते सुतळी वर तारेला बांधावी तारेला बांधताना सुद्धा जास्त लुज राहणार नाही आणि जास्त तानावर राहणार नाही याची काळजी घ्यावी.तसेच खोडाला गाठ मारणार आहे ती पण घट्ट मारू नये घट्ट मारल्यास त्याची जखम होईल व त्या जखमेतून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
बांधणी अगोदर कोणत्या उपाययोजना कराव्यात.
✅बांधणी अगोदर शेतात पाणी द्यावे.जेणेकरून बांधणी करताना रोपांवर येणारा अजैविक ताण कमी होईल.
✅बांधणी करण्यापूर्वी बुरशीनाशकाची फवारणी करावी ज्यामुळे रोपांवर असणाऱ्या बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य रोगांवर नियंत्रण मिळेल व बांधणी करताना मजुरांद्वारे याचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होणार नाही.
✅तसेच या फवारणीमुळे फांद्या खोडाची लवचिकता वाढेल व रोपांची ताण सहनक्षमता वाढेल.
✅रोपांची बांधणी करण्यापूर्वी जे पाणी द्यायचे आहे त्या पाण्यामध्ये खालील खते सोडावीत.जेणेकरून खोडाचा लवचिकपणा वाढेल व रोगप्रतिकारशक्ती व ताण सहनक्षमता वाढेल.
रोपांची बांधणी पूर्ण झाल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात.
✅बांधणी झाल्यानंतर शेतास पाणी द्यावे जेणेकरून रोपांवर आलेला अजैविक ताण कमी होईल.
✅बांधणी झाल्यानंतर फवारणी करावी ज्यामुळे रोपांना ज्या जखमा झाल्यात त्यामधून बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही तसेच रोपांना झालेल्या जखमा लवकर भरून येतील व रोपांवर आलेला अजैविक ताण करणे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होईल.