टोमॅटो रोपांची दुसरी बांधणी कधी करावी? 

Farmspot Agro

टोमॅटो रोपांची दुसरी बांधणी कधी करावी कशासाठी करावी व कशा प्रकारे करावी  व करण्याअगोदर आणि नंतर कोणती काळजी घ्यावी किंवा उपाययोजना कराव्यात. 

टोमॅटो रोपांची दुसरी बांधणी कधी करावी? 

✅टोमॅटो रोपांची रोप वाढीची अवस्था पूर्ण झाल्यानंतर रोपांची फुलअवस्था सुरू होते.रोप वाढीच्या अवस्थेत जे फुटवे निघतात त्या फुटव्यांच्या शेंड्यावर नवीन फुलांच्या बंचची निर्मिती होते.त्या फुटव्यांची लांबी ही 25 ते 30 Cm च्या दरम्यान असताना टोमॅटो रोपांची दुसरी बांधणी करावी.सर्वसाधारण फुलांपासून फळधारणा सुरू होण्याच्या टप्प्यात करावी सर्वसाधारण लागवडीनंतर 35 ते 40 दिवसांनी दुसरी बांधणी करा. 

टोमॅटो रोपांची दुसरी बांधणी कशासाठी करावी?

✅टोमॅटो रोपांच्या वाढीच्या अवस्थेत रोपांना नवीन फुटवे निघतात,त्या फुटव्यांच्यावर फुलांचे बंच येतात व जेव्हा त्या फुलांपासून फळधारणा होत असते तेव्हा त्या फुटव्यांवर किंवा फांदीवर वजन वाढते,ज्यामुळे फांद्या जमिनीवर लोळतात.ज्यामुळे पानांचा मातीशी संबंध आल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो,तसेच आतबांधणी केली नाही तर पुढे फळांवरी गळ होणे,फळावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणे यांसारख्या अडचणी येतात. 

टोमॅटो रोपांची दुसरी बांधणी कशा प्रकारे करावी?

✅टोमॅटो रोपांची दुसरी बांधणी ही रोपांच्या फांदी व फुटवे बांधण्यासाठी करायची असते.त्यामुळे रोपांच्या ज्या फांद्या आहेत त्यांच्या शेंड्याकडे सुतळीने लूज गाठ मारावी व सुतळी तारेला बांधावी.सुतळी जास्त ताणून बांधू नये जर ताणून बांधले तर वारे आल्यानंतर फांद्याच्या हालचालीमुळे घर्षण होऊन रोपांना जखमा होतात व  जखमांमधून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.तसेच गाठ पण लुज बांधावी जेणेकरून रोपांना त्या जागी जखम होणार नाही.

बांधणी अगोदर कोणत्या उपाययोजना कराव्यात.

✅बांधणी अगोदर शेतात पाणी द्यावे.जेणेकरून बांधणी करताना रोपांवर येणारा अजैविक ताण कमी होईल.
बांधणी करण्यापूर्वी फवारणी करावी ज्यामुळे रोपांवर असणाऱ्या बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य रोगांवर नियंत्रण मिळेल व बांधणी करताना मजुरांद्वारे याचा प्रसार एका भागातून दुसऱ्या भागात होणार नाही.
तसेच या फवारणीमुळे फांद्या खोडाची लवचिकता वाढेल व रोपांची ताण सहनक्षमता वाढेल.
रोपांची बांधणी करण्यापूर्वी जे पाणी  द्यायचे आहे त्या पाण्यामध्ये खालील खते सोडावीत.जेणेकरून खोडाचा लवचिकपणा वाढेल व रोगप्रतिकारशक्ती व ताण सहनक्षमता वाढेल. 

रोपांची बांधणी पूर्ण झाल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात.
✅बांधणी झाल्यानंतर शेतास पाणी द्यावे  जेणेकरून रोपांवर आलेला अजैविक ताण कमी होईल.
बांधणी झाल्यानंतर फवारणी करावी ज्यामुळे रोपांना ज्या जखमा झाल्यात त्यामधून बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही तसेच रोपांना झालेल्या जखमा लवकर भरून येतील व रोपांवर आलेला अजैविक ताण करणे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होईल. 


 

Back to blog