एकरी टोमॅटो रोपांची संख्या किती असावी?
Farmspot AgroShare
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 4.5 फुट व दोन रोपांमधील अंतर 1.5 फुट असेल तर एकरात सर्वसाधारण 7500 ते 7700 रोपे बसतील.
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 5 फुट असेल व दोन रोपांमधील अंतर 1.25 फूट असेल तर एकरात सर्वसाधारण 6800 ते 6900 रोपे बसतील.
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 5 फुट असेल व दोन रोपांमधील अंतर 1.5 फूट असेल तर एकरात सर्वसाधारण 5600 ते 5800 इतकी रोपे बसतील.
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 6 फुट असेल व दोन रोपांमधील अंतर 1.25 फूट एवढे असेल तर एकरात सर्वसाधारण 5600 ते 5800 इतकी रोपे बसतील.
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 6 फुट असेल व दोन रोपांमधील अंतर 1.5 फूट एवढे असेल तर एकरात सर्वसाधारण 4800 ते 5000 इतकी रोपे बसतील.
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 5.5 फुट असेल व दोन रोपांमधील अंतर 1.25 फूट एवढे असेल तर 6300 ते 6500 एवढी रोपे बसतील.
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 5.5 फुट असेल व दोन रोपांमधील अंतर 1.5 फूट असेल तर 5000 ते 5200 एवढी रोपे बसतील.
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 8 फुट असेल व एका गादीवाफ्यावर झिगझॅक पद्धतीने दोन ओळी व दोन रोपांमधील अंतर हे जर 1.5 फूट असेल तर एकरात 7260 एवढी रोपे बसतील.
▸जर दोन ओळींमधील हे 8 फुट असेल व एका गादीवाफ्यावर झिगझॅक पद्धतीने दोन ओळी व दोन रोपांमधील अंतर हे जर 1.2 फूट असेल तर एकरात 5400 ते 5500 एवढी रोपे बसतील.