टोमॅटो रोपांची पाने रुंद,पसरट जाड व हिरवीगार होण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात.
Farmspot AgroShare
टोमॅटो रोपांची पाने रुंद,पसरट,जाड व हिरवीगार होण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.
▸ टोमॅटो पानांचा आकार रुंद व पसरट होण्यासाठी सूर्यप्रकाश गरजेचा आहे. त्यासाठी जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी दोन रोपांमधील व दोन ओळी मधील अंतर जास्त असावे, जेणेकरून पानांवर सूर्यप्रकाश चांगला पडेल व रोपांची पाने रुंद, पसरट होतील.
▸ जास्त पाणी दिल्यास मुळांची कार्यक्षमता कमी होईल व अन्नद्रव्य पुरवठा कमी झाल्यामुळे पानांची वाढ थांबेल, त्याउलट जर कमी प्रमाणात पाणी दिले तर पानांचा आकार लहान होतो. यामुळे पाने रुंद व पसरट करण्यासाठी रान जास्तीत जास्त वाफस्यावर कसे राहिल याची काळजी घ्यावी.
▸ पानांचा आकार रुंद, पसरट होण्यासाठी मॅग्नेशियम, सिलिकॉन युक्त उत्पादनांचा वापर फवारणी किंवा ठिबकद्वारे करावा. पाने आतून तेलकट हिरवीगार होण्यासाठी सल्फरयुक्त उत्पादनांचा वापर करावा.
▸ पाने रुंद,पसरट व जाड हिरडीगार होण्यासाठी,पानांचा विकास होण्यासाठी रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत पद्धतीने होणे गरजेचे आहे.त्यासाठी रोपांवर येणारा जैविक व अजैविक ताण कमी करण्यासाठी अमिनोऍसिड,सिव्हिड व इतर पोषक उत्पादनांचा वापर फवारणी द्वारे करावा.
अशा प्रकारे जर आपण योग्य अंतर, पाण्याचे योग्य नियोजन, अन्नद्रव्ये नियोजन, पोषक उत्पादनांचा वापर योग्य पद्धतीने केल्यास रोपांची पाने रुंद व पसरट होतात.