टोमॅटो रोपांच्या फुलांची संख्या वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात?

Farmspot Agro

✅टोमॅटो रोपांच्या फुलांची संख्या ही टोमॅटो रोपांच्या वाढीच्या अवस्थेत रोपांची वाढ कशा प्रकारे होते यावर अवलंबून आहे.जर रोप वाढीच्या अवस्थेत रोपांचे खोड जाड असेल तर रोपांना संख्येने जास्त व आकाराने जाड फुटवे निघतात,तसेच या फुटव्यांना निघणाऱ्या फांद्या या जाड व संख्येने जास्त निघतात. जेवढे जास्त फुटवे व फांद्या असतात तेवढे फुले संख्येने जास्त व चांगल्या गुणवत्तेची असतात.यामुळे रोप फुलअवस्थेतअसताना फुलांची संख्या वाढवण्यासाठी रोपवाढीच्या अवस्थेत रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे तरच टोमॅटोमध्ये फुलांची संख्या वाढते.

फुलांची संख्या वाढण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात?

✅टोमॅटो रोपांची फुलावस्था ही प्रामुख्याने 30 ते 35 दिवसांनी सुरू होते.या अवस्थेत फुलांची संख्या  वाढवण्यासाठी रोपांना सूर्यप्रकाश जास्त व चांगल्या गुणवत्तेचा मिळणे गरजेचे आहे.त्यासाठी सर्वप्रथम लागवडीची दिशा हंगामानुसार योग्य असणे गरजेचे आहे.
त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून संपूर्ण माहिती घ्या.
तसेच टोमॅटो रोपांची दुसरी बांधणी ही टोमॅटो रोपांची फुलावस्था मध्यावर आल्यानंतर म्हणजेच रोप लागवडीनंतर 35 ते 40 दिवसांनी करावी.जेणेकरून रोपांना चांगला सूर्यप्रकाश मिळेल व त्यामुळे फुलांची संख्या वाढेल. 

संतुलित खत नियोजन 

✅टोमॅटो रोपांना फुलांची निर्मिती होण्यासाठी फुलावस्थेमध्ये योग्य प्रकारे खत नियोजन करणे गरजेचे आहे.
त्यासाठी रोपवाढीच्या अवस्थेत व फळधारणेच्या अवस्थेत खालीलपैकी एक फवारणी करावी.रासायनिक खत नियोजन करावे.

योग्य प्रकारे पाणी नियोजन 

✅टोमॅटो रोपांना फुलावस्थेमध्ये योग्य प्रकारे पाणी नियोजन करावे.रोपांची फुलावस्था सुरू होण्याच्या अगोदर 3 दिवस पाण्याचा ताण द्यावा.पाण्याचा ताण दिल्यामुळे फुलांची संख्या वाढेल तसेच फुलावस्थेत योग्य प्रकारे पाणी नियोजन करावे.  


 

Back to blog