टोमॅटो रोपांचे खोड जाड होण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात

Farmspot Agro

▸ टोमॅटो रोपांचे खोड जाड असेल तर निघणारे फुटवे व शेंडे जाड निघतात. रोपांची शाखीय वाढ चांगल्या प्रकारे होते. ज्यामुळे फुल अवस्थेत फुलांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. अशा प्रकारे टोमॅटो खोडाचा आकार उत्पादनावर थेट परिणाम करतो. खोडाची जाडी वाढवण्यासाठी बरेच घटक जबाबदार असतात.

✅खोड जाड होण्यासाठी करायच्या उपाययोजना

▸ दोन रोपांमधील अंतर व दोन ओळीमधील अंतर जास्त असावे, जेणेकरून रोपांना जास्त प्रमाणात व चांगल्या गुणवत्तेचा सूर्यप्रकाश मिळतो. ज्यामुळे रोपांची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते. ज्यामुळे ऊर्जानिर्मिती होऊन रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होईल व खोडांची जाडी चांगल्या प्रकारे होईल.

▸ उन्हाळ्यामध्ये जेव्हा तापमान वाढते, तेव्हा रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया असंतुलित होतात व रोपांची वाढ खुंटते. ज्यांचा थेट परिणाम असा होतो की रोप वाढीच्या अवस्थेत खोडाची जाडी कमी होते. यामुळे उन्हाळ्यामध्ये तापमान कमी करण्यासाठी तुषार सिंचनचा वापर करावा, तसेच तापमान वाढीचा ताण कमी करण्यासाठी पोषक उत्पादनांच्या फवारण्या वारंवार कराव्यात.

▸ शेतामध्ये सतत वाफसा स्थिती राहील याची काळजी घ्यावी. जेणेकरून अन्नद्रव्य निर्मिती व शोषण चांगल्या प्रकारे होईल आणि रोपांची वाढ व विकास त्याचबरोबर रोप वाढीच्या अवस्थेत खोडांची जाडी ही चांगल्या प्रकारे वाढेल. त्यासाठी शेतात वाफसास्थिती राहण्यासाठी पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी, तसेच शेतात जास्त काळ वाफसास्थिती राहील या हिशोबाने पाणी नियोजन करावे.

▸ टोमॅटो खोडाची जाडी वाढवण्यासाठी फॉस्फरस, पोटॅश यांसारख्या अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात संतुलित पद्धतीने करावा, ज्यामुळे खोडाची जाडी चांगल्या प्रकारे होईल.

▸ टोमॅटो खोडाची जाडी वाढवण्यासाठी सायटोकायनिन, जिब्रेलिक, ब्रासिनोस्टेरॉईड या संप्रेरकांचा वापर फवारणीद्वारे करावा.

▸ टोमॅटो रोपांच्या खोडाची जाडी वाढवण्यासाठी पोषक उत्पादनांचा वापर फवारणीद्वारे करावा.

▸ टोमॅटो रोपांच्या खोडाची जाडी वाढवण्यासाठी अन्नद्रव्ये उत्पादनांचा वापर फवारणीद्वारे करावा.

Back to blog