टोमॅटो रोप लागवडीनंतर पहिल्या 15 दिवसांत पाने पिवळी पडत असतील तर काय उपाययोजना कराव्यात?

Farmspot Agro

✅ पाने पिवळी पडण्याची कारणे

▸ टोमॅटो रोपांची ज्या वेळेस लागवड केली जाते, त्या वेळेस रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ कोकोपीट बाहेर जमिनीत होते व रोपे जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण करतात. ज्यास आपण रोपे सेट झाले असे समजतो, परंतु काही परिस्थितीमध्ये रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ कोकोपीट बाहेर जमिनीत होत नाही, ज्यामुळे रोपांची मुळे अन्नद्रव्ये शोषण करत नाहीत व अन्नद्रव्य पुरवठा कमी झाल्यामुळे रोपांची पाने पिवळसर पडायला लागतात व 2 ते 3 दिवसांनी संपूर्ण पाने पिवळी पडतात हे रोपे पिवळे पडण्याचे प्रमुख कारण आहे.

▸ टोमॅटो रोपांना जर सुरुवातीच्या टप्प्यात पिथियम बुरशीचा प्रादुर्भाव झाला, तर रोपांच्या वरील भागाचा अन्नपुरवठा कमी होतो व ज्यामुळे पिथियम बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांची पाने पिवळी पडतात.

✅ उपाययोजना

▸ या अडचणीवर उपाययोजना करताना दोन्ही कारणे लक्षात घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे व त्यानुसार उपाययोजना कराव्यात.

Back to blog