टोमॅटो पिकात नायट्रोजन कमतरतेची लक्षणे काय आहेत व त्यामुळे काय नुकसान होते?

Farmspot Agro

✅लक्षणे

▸ नायट्रोजनची कमतरता निर्माण झाल्यावर पाने फिकट हिरवी किंवा पिवळसर रंगाची होतात, पानांचा आकार लहान होतो. लक्षणे सर्वप्रथम जुन्या पानांवर दिसतात व हळूहळू नवीन पानांवर सुद्धा दिसायला लागतात. पानांच्या शिरा जांभळ्या रंगाच्या होतात, कालांतराने पाने तपकिरी होतात व गळून जातात.

✅कारणे

▸ जमिनीचा pH हा जास्त किंवा कमी असणे.
▸ हलक्या जमिनीत नायट्रोजन कमतरता निर्माण होऊ शकते.
▸ दुष्काळी परिस्थितीत अन्नद्रव्य शोषण कमी होते परिणामी नायट्रोजन कमतरता होऊ शकते.
▸ अति पाऊस झाल्यामुळे जमिनीमधून जास्त प्रमाणात पाणी शेताच्या बाहेर वाहून जाते व परिणामी नायट्रोजन कमतरता भासते.
▸ जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर कमी असेल तर नायट्रोजन कमतरता जाणवते.

✅नुकसान

▸ पाने पिवळी पडल्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया थांबते किंवा कमी प्रमाणात होते परिणामी रोपांची वाढ खुंटते.
▸ नायट्रोजन हे अमिनो ॲसिड, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड संश्लेषणात महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे त्याची कमतरता झाल्यास रोपांची वाढ थांबते.

✅उपाययोजना

▸ जमिनीचा pH संतुलित ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
▸ हलक्या जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीची गुणवत्ता वाढवावी.
▸ दुष्काळी परिस्थितीत नायट्रोजन युक्त खतांचा किंवा अमिनो युक्त उत्पादनांचा फवारणीद्वारे वापर करावा.
▸ जोरात पाऊस पडून गेल्यानंतर नायट्रोजन युक्त खतांचा वापर करावा.
▸ रोपांची वाढीची अवस्था लक्षात घेऊन गरजेनुसार नायट्रोजन युक्त खतांचा वापर करावा.



Back to blog