टोमॅटो पिकात मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे काय आहेत? नुकसान काय करतात व उपाययोजना काय कराव्यात.

Farmspot Agro

लक्षणे

▸ जुनी पाने पिवळसर होतात. परंतु त्यांच्या शिरा या गडद हिरव्या रंगाच्या राहतात. पाने पिवळी पडताना सर्वप्रथम पानांच्या कडेच्या बाजूने पिवळी पडायला सुरुवात होते. कालांतराने संपूर्ण पान पिवळे पडून गळून जाते. तसेच पाने पिवळी पडायला सुरुवात झाल्यावर पानांवर फिकट तपकिरी ठिपके येतात. मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे ही नायट्रोजन व फेरस या अन्नद्रव्यांच्या कमतरतेशी मिळती-जुळती असतात. त्यामुळे बरेच शेतकरी मॅग्नेशियम कमतरतेचे निदान करू शकत नाहीत.

✅कारणे

▸ ज्या जमिनीमध्ये पोटॅश, अमोनियम व कॅल्शियम या अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीमध्ये मॅग्नेशियम कमतरता मोठ्या प्रमाणावर असते.
▸ हलक्या जमिनीमध्ये मॅग्नेशियमची कमतरता ही मोठ्या प्रमाणावर असते.
▸ ज्या जमिनीचा pH कमी असतो अशा जमिनीमध्ये मॅग्नेशियमची कमतरता मोठ्या प्रमाणावर असते.
▸ ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीमध्ये मॅग्नेशियम कमतरता मोठ्या प्रमाणावर असते.
▸ जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे मॅग्नेशियम रोपांच्या मुळांच्या कक्षेतून वाहून जातो, ज्यामुळे मॅग्नेशियमची कमतरता जाणवते.

✅नुकसान

▸ मॅग्नेशियम हे हरितकण निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया कमी होते व रोपांची वाढ खुंटते.
▸ मॅग्नेशियम कमतरतेचा थेट परिणाम पाणी शोषणावर होतो, परिणामी रोपांची वाढ खुंटते.
▸ मॅग्नेशियम कमतरतेमुळे फळे कमी दर्जाची होतात, त्यांचे वजन व आकार कमी होतो.
▸ मॅग्नेशियम कमतरतेमुळे रोपांची प्रतिकारशक्ती कमी होते, ज्यामुळे किडी व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

✅उपाययोजना

▸ मॅग्नेशियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम नायट्रेट खतांचा वापर करावा.
▸ माती परीक्षण करून त्यामधील मॅग्नेशियमचे प्रमाण तपासून त्यानुसार खत नियोजन करावे.
▸ पाऊस पडल्यानंतर मॅग्नेशियमयुक्त खतांचा वापर फवारणी व ठिबकद्वारे करावा.
▸ जमिनीचा pH संतुलित ठेवावा, ज्यामुळे मॅग्नेशियमची उपलब्धता वाढेल.

Back to blog