टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थेत करायचे पाणी नियोजन
Farmspot AgroShare
टोमॅटो रोप वाढीची अवस्था ही रोप लागवडीनंतर 12 ते 35 दिवसांच्या दरम्यान असते.
▸ टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थेत रोपांच्या वाढीसाठी व विकासासाठी रोपांचे पाणी नियोजन योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.
टोमॅटो पिकामध्ये पाणी नियोजन करत असताना हंगाम, वातावरण त्याचबरोबर जमिनीचा प्रकार लक्षात घेणे गरजेचे आहे.
✅मातीच्या प्रकारानुसार पाणी नियोजन
काळी माती (जाड माती)
▸ अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. अशा जमिनीत रोप वाढीच्या अवस्थेत 15 ते 25 दिवसांच्या दरम्यान 1 दिवसाआड 20 ते 25 मिनिटे पाणी द्यावे व रोप वाढीच्या अवस्थेत 25 ते 35 दिवसांच्या दरम्यान दररोज 15 मिनिटे पाणी द्यावे.
▸ अशा प्रकारे रोप वाढीच्या अवस्थेत असताना जाड मातीमध्ये ठिबकद्वारे पाणी नियोजन करावे.
आंबट माती (मध्यम जाड माती)
▸ अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम असते व अशा जमिनीमध्ये पाण्याचा निचरा कमी होतो. त्यामुळे अशा जमिनीत रोप वाढीच्या अवस्थेत 15 ते 25 दिवसांच्या दरम्यान दररोज 15 ते 20 मिनिटे पाणी द्यावे व रोपवाढीच्या अवस्थेत 25 ते 35 दिवसांच्या दरम्यान दररोज 20 ते 25 मिनिटे पाणी द्यावे.
▸ अशा प्रकारे रोप वाढीच्या अवस्थेत असताना मध्यम मातीमध्ये ठिबकद्वारे पाणी नियोजन करावे.
मुरमाड किंवा वाळूजार माती (हलकी माती)
▸ या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप कमी असते. तर पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणावर होतो. अशा जमिनीत रोप वाढीच्या अवस्थेत 15 ते 25 दिवसांच्या दरम्यान दररोज 20 ते 25 मिनिटे पाणी द्यावे. तसेच रोप लागवडीनंतर 25 ते 35 दिवसांच्या दरम्यान 25 ते 30 मिनिटे एवढा वेळ पाणी द्यावे.
▸ अशा प्रकारे मुरमाड, वाळूजार व हलक्या जमिनीत ठिबकद्वारे पाणी नियोजन करावे.