टोमॅटो पिकात फळ फुगवणीच्या अवस्थेत करायचे पाणी नियोजन

Farmspot Agro

▸ टोमॅटो रोपांची फळ फुगवणीची अवस्था ही रोप लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी सुरू होते.
▸ टोमॅटो फळधारणेच्या अवस्थेत रोपांच्या वाढीसाठी व रोपांच्या विकासासाठी रोपांच्या पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.

मातीच्या प्रकारानुसार पाणी नियोजन

✅काळी माती (जाड माती)
▸ या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते व पाण्याचा निचरा कमी प्रमाणात होतो. अशा मातीत 50 दिवसांच्या पुढे रोज 35 ते 40 मिनिटे पाणी द्यावे.

✅तांबट माती (मध्यम हलकी माती)
▸ या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम असते व पाण्याचा निचरा मध्यम प्रमाणात होतो. अशा मातीत 50 दिवसांच्या पुढे रोज 40 ते 50 मिनिटे पाणी द्यावे.

✅मुरमाड, वाळूजार माती (हलकी माती)
▸ या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते व पाण्याचा निचरा जास्त प्रमाणात होतो. अशा मातीत रोप लागवडीनंतर 50 दिवसांच्या पुढे रोज 1 तास पाणी द्यावे.

अशा प्रकारे फळ फुगवणीच्या अवस्थेत मातीच्या प्रकारानुसार ठिबकद्वारे पाणी नियोजन करावे.



Back to blog