टोमॅटो पिकात फुलावस्थेत करायचे पाणी नियोजन
Farmspot AgroShare
▸ टोमॅटो फुल अवस्था ही लागवडीनंतर 35 दिवसांनी सुरू होते.
▸ टोमॅटो रोपांच्या फुल अवस्थेत वाढीसाठी व विकासासाठी रोपांच्या पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.
▸ टोमॅटो पिकात पाण्याचे नियोजन करत असताना हंगाम, वातावरणीय परिस्थिती, जमिनीचा प्रकार लक्षात घेणे गरजेचे आहे.
मातीच्या प्रकारानुसार पाणी नियोजन
✅काळी माती (जाड माती)
या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते व अशा जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही.
▸ अशा मातीत फुल अवस्थेमध्ये 35 ते 40 दिवसांच्या दरम्यान 35, 36, 37 व्या दिवशी फुलांची संख्या वाढण्यासाठी पाण्याचा ताण द्यावा. त्यानंतर 39 दिवसांपासून पुढे 45 दिवसांपर्यंत रोज 20 ते 30 मिनिटे पाणी द्यावे.
✅तांबट माती (मध्यम माती)
▸ या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते व पाण्याचा निचरा पण मध्यम स्वरूपाचा होतो.
▸ अशा मातीत फुल अवस्थेमध्ये रोप लागवडीनंतर 35, 36 व्या दिवशी फुलांची संख्या वाढण्यासाठी पाण्याचा ताण द्यावा. त्यानंतर 37 दिवसांपासून पुढे 45 दिवसांपर्यंत रोज 25 ते 35 मिनिटे पाणी द्यावे.
✅मुरमाड व वाळूजार माती
▸ या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते व पाण्याचा निचरा जास्त प्रमाणात होतो.
▸ अशा मातीत फुलवस्थेत रोप लागवडीनंतर 35 व्या आणि 36 व्या दिवशी पाण्याचा ताण द्यावा व 36 ते 45 दिवसांच्या दरम्यान रोज 30 ते 45 मिनिटे पाणी द्यावे.
▸ अशा प्रकारे फुल अवस्थेत मातीच्या प्रकारानुसार ठिबकद्वारे पाणी नियोजन करावे.