टोमॅटो रोप रुजण्याची अवस्था

Farmspot Agro

✅टोमॅटो रोप रुजण्याची अवस्था हि रोप लागवड ते पहिले 15  दिवस असते. कोणतीही वनस्पती सर्वप्रथम लागवडीनंतर रोपांच्या मुळांचा विकास करते व त्यानंतर रोपांच्या वरील भागांचा विकास करते.

टोमॅटो रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांचा विकास हा खालील प्रमाणे होतो.
▸
टोमॅटो रोप रुजण्याची अवस्था हि रोप लागवड ते पहिले 15 दिवस असते. कोणतीही वनस्पती सर्वप्रथम लागवडीनंतर रोपांच्या मुळांचा विकास करते व त्यानंतर रोपांच्या वरील भागांचा विकास करते.
▸ टोमॅटो रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपे पांढऱ्या मुळांची वाढ कोकोपीट बाहेर जमिनीत करतात.
▸ टोमॅटो रोपांच्या मुळांची वाढ कोकोपीट बाहेर जमिनीत झाल्यानंतर रोपांना दोन पानांचा नवीन शेंडा येतो. त्यानंतर रोपांना नवीन पाने येतात.
▸ रोपांची पाने रुंद, पसरट, जाड व  हिरवीगार होतात.रोपांना लहान - लहान फुटवे व नवीन शेंडे निघतात.

✅या अवस्थेत येणारे बुरशीजन्य रोग

रोप रुजण्याची अवस्था ही रोप लागवड ते पहिले 15 दिवस असते,रोप रुजण्याच्या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात.

▸ रायझोक्टोनिया रोपमर (Rhizoctonia solani)
▸
पिथियम रोपमर (Pythium)
▸
लवकर येणारा करपा (Alternaria solani)
▸
सेप्टोरिया काळे ठिपके (Septoria lycopersici)
▸
स्टेमफायलियम राखाडी ठिपके(Stemphyllium solani)

✅या अवस्थेत येणाऱ्या किडी

▸मावा
मावा हि किड सोंडेच्या साह्याने रसशोषण करतात. त्यामुळे अतिप्रमाणात पाने आकसतात व पाने पिवळी पडतात,ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया मंदावते व रोपांची वाढ खुंटते..
या रसशोषण कीडींच्या प्रादुर्भावमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.

▸ तुडतुडे 
या कीडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पाने आकसतात,पानांवर पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात.किंवा पानांवर पिवळसर डाग दिसतात.ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया यांसारख्या असंख्य प्रक्रिया मंदावतात,ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते व विकास थांबतो.या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.

▸ पांढरी माशी
या कीडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानाच्या वाट्या होतात,पाने पिवळी पडतात,पानांवर ठिपके दिसतात.यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या प्रक्रिया असंतुलित होतात,ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते.

▸ नागअळी
या कीडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांच्या पानांवर नागमोडी आकाराचे पांढऱ्या रंगाचे लहान चट्टे दिसतात.ज्यामुळे पानांमधील हरितकणाचे प्रमाण कमी होते.व प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते.
पानांमधील शिरांणा हानी पोहचते.ज्यामुळे वहन प्रक्रिया विस्कळीत होते.एकंदरीत या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.

▸ काळी कुरतडणारी अळी
हि किड रोपांचे खोड जमिनीलगत कट करते.ज्यामुळे त्या जागेचे रोप बदलायला लागते.

▸हेलीकोव्हर्प सुरवंट
हि किड पानांवर खाते व फळ पोखरते ज्यामुळे नुकसान होते व रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिय,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया असंतुलित होते व ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.

✅या अवस्थेत येणाऱ्या इतर अडचणी
टोमॅटो पिकाची रोग रुजण्याची अवस्था ही रोप लागवडीनंतर पहिले 15 दिवस असते. या अवस्थेत खालील अडचणी येतात.

▸ रोपांची मर होते
टोमॅटो पिकात सुरुवातीच्या टप्प्यात पिथियम सारख्या बुरशीमुळे रोपांची मर होते. उन्हाळ्यात टोमॅटो लागवड केली असल्यास आणि मल्चिंग पेपरचा वापर केला असल्यास मल्चिंग मधील गरम वाफ रोपांवर येते आणि रोपांची मर होते.

▸ रोपांवर अजैविक ताण येतो
टोमॅटो रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर रोपांवर पुर्नलागवडीचा ताण येतो.

▸ रोपे लवकर सेट होत नाहीत
रोपांची लागवड केल्यानंतर पहिले 15 दिवस हा रोपे सेट होण्याचा कालावधी असतो. या काळात मुळे कोकोपीटमधून जमिनीत वाढतात आणि दोन पानांचा शेंडा येतो. काही परिस्थितींमध्ये मुळे कोकोपीटमधून जमिनीत वाढत नाहीत आणि रोपे पिवळी पडतात.

▸ गरजेपेक्षा जास्त पाणी होणे
या अवस्थेत रोपांची मुळे जमिनीत जास्त वाढत नाहीत. त्यामुळे ठिबकाद्वारे जास्त पाणी देण्याऐवजी आळवणीद्वारे पोषक द्रव्य देणे आवश्यक आहे. पण रोपे पिवळी पडल्यामुळे शेतकरी जास्त पाणी देतात, ज्यामुळे रोपांची मर सुरू होते.

▸ गरजेपेक्षा कमी पाणी देणे
जर रोपांना लागवडीनंतर गरजेपेक्षा कमी पाणी दिले तर रोपे सुकण्यास सुरुवात करतात.

▸ रोपे पिवळी पडणे
जर रोपे लवकर सेट होत नसतील, तर जमिनीतून अन्नद्रव्य शोषण होत नाही आणि अन्नद्रव्य कमतरतेमुळे रोपे पिवळी पडतात.

 

Back to blog