टोमॅटो रोप वाढीची अवस्था
Farmspot AgroShare
✅टोमॅटो रोप वाढीची अवस्था ही रोप लागवडीनंतर 15 दिवस ते 35 दिवसांच्या दरम्यान असते.टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थेत रोपांचा विकास खालील प्रमाणे होतो:
▸ टोमॅटो रोप वाढीची अवस्था ही रोप लागवडीनंतर 12 दिवस ते 35 दिवसांच्या दरम्यान असते.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांचे खोड हे जाड होते. खोड जाड झाल्यामुळे निघणारे फुटवे व निघणारे शेंडे जाड
निघतात, ज्यामुळे फुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते.
▸ या अवस्थेत नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात.
▸ या अवस्थेत दोन फांद्यांमधील व पेऱ्यामधील अंतर कमी असणे गरजेचे आहे. जर अंतर वाढले तर फुल अवस्थेत फुलांची संख्या कमी होते.
▸ या अवस्थेत रोपांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार व आतून तेलकट होतात.
▸ या अवस्थेत नवीन पानांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते.
✅या अवस्थेत येणारे बुरशिजन्य रोग
टोमॅटो रोप वाढीची अवस्था ही रोप लागवडी नंतर 15 ते 35 दिवसांच्या दरम्यान असते. या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात.
▸ पिथीयम रोपमर (Pythium spp)
▸ डीडीमेला रोपमर (Didymella lycopersici )
▸ फ्यूजारियम रोपमर (Fusarium Oxysporum)
▸ रायझोक्टोनिया रोपमर (Rhizoctonia solani)
▸ लवकर येणारा करपा (Alternaria solani)
▸ व्हर्टिसिलियम रोपमर (verticillium spp)
▸ भुरी (odium neolycoperisici)
▸ सेप्टोरिया काळे ठिपके (Septoria lycopersici)
▸ स्टेमफायलियम राखाडी ठिपके (Stemphyllium solani)
✅या अवस्थेत येणारे विषाणूजन्य रोग
टोमॅटो रोप वाढीची आवस्था ही रोप लागावडीनंतर 15 ते 35 दिवसांच्या दरम्यान असते. या अवस्थेत खालील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. (विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा रसशोषक किडीच्या मार्फत होतो.
▸ CMVC (Cucumber mozaic virus)
▸TLCVC (Tomato leaf curl virus)
✅या अवस्थेत येणाऱ्या किडी
▸मावा
मावा हि किड सोंडेच्या साह्याने रसशोषण करतात. अतिप्रमाणात पाने आकसतात व पाने पिवळी पडतात, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया मंदावते व रोपांची वाढ खुंटते. या रसशोषण कीडींच्या प्रादुर्भावमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
▸तुडतुडे
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पाने आकमतात, पानांवर पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात किंवा पानांवर पिवळसर डाग दिसतात. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या असंख्य प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते व विकास थांबतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
▸ पांढरी माशी
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानाच्या वाट्या होतात, पाने पिवळी पडतात, पानांवर ठिपके दिसतात. यामुळे रोपांवर जैविक ताण येतो. रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या प्रक्रिया असंतुलित होतात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते.
▸ हेलीकोव्हर्पा सुरवंट
हि किड पानांवर खाते, ज्यामुळे पिकाचे नुकसान होते व रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिय,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया असंतुलित होते व ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.
▸ नागअळी
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांच्या पानांवर नागमोडी आकाराचे पांढऱ्या रंगाचे लहान चट्टे दिसतात. ज्यामुळे पानांमधील हरितकणाचे प्रमाण कमी होते व प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते. पानांमधील शिरांणा हानी पोहचते. ज्यामुळे वहन प्रक्रिया विस्कळीत होते. एकंदरीत या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.
▸ फूलकिडे
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानांवर बारीक चंदेरी चट्टे पडतात. ज्यामुळे पाने आकसतात, पाने पिवळी पडतात. यामुळे रोपांची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया, विस्कळीत होते. परिणामी रोपांची वाढ खुंटते व विकास थांबतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
▸ टोमॅटो हॉर्नवॉर्म
हि अळी टोमॅटोच्या कावळया पानांवर खाणे सुरू करते. ज्यामुळे पानांना जखमा होतात. त्यातून बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. पानांचे नुकसान झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया यावर होतो. ज्याचा एकंदरीत परिणाम हा रोपांच्या वाढीवर व विकासावर होतो.
✅या अवस्थेत येणाऱ्या इतर अडचणी
टोमॅटो पिकाची रोप वाढीच्या अवस्था हि रोप लागवडीनंतर पहिले 15 दिवस ते 35 दिवसांच्या दरम्यान असते. या अवस्थेत खालील अडचणी येतात.
▸रोपांवर येणारा जैविक व अजैविक ताण
रोप लागवडीनंतर 15 दिवसांनी तापमान, आद्रता, उष्णता यांसारख्या पर्यावरणीय घटकांमुळे रोपांवर अजैविक असा ताण येतो, तर किडी, बुरशीजन्य रोग यांच्या प्रादुर्भावामुळे रोपावर जैविक ताण येतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या असंख्य प्रक्रिया मंदावतात ज्याचा थेट परिणाम रोपांच्या वाढीवर व विकासावर होतो.
▸ रोपांच्या दोन फांद्यांमधील अंतर वाढणे
ज्यावेळेस रोपवाढीची अवस्था असते तेव्हा जर का नायट्रोजनचे प्रमाण वाढले तर रोपांच्या दोन फांद्यांमधील अंतर वाढते व त्याचा थेट परिणाम रोपांच्या फुलांच्या संख्येवर व शाखीय वाढीवर होतो. जर का दोन फांद्यांमधील अंतर जास्त असेल तर शाकीय वाढ कमी होते व फुलांची संख्या कमी असते. आणि जर का दोन फांद्यामधील अंतर कमी असेल तर शासकीय वाढ चांगली होते व फुलांची संख्या वाढते.
▸ रोपांचे खोड पातळ राहणे
ज्यावेळेस रोपवाढीची अवस्था चालू असते त्यावेळेस जर का खोड जाड झाले तर निघणारे फुटवे जाड निघतात व फांद्यासुद्धा जाड निघतात. ज्यामुळे फुलांची संख्या व गुणवत्ता चांगली असते. त्याउलट जर का खोड पातळ असेल तर निघणारे फुटवे व फांद्या जाड निघतात, फुटवे सुद्धा जास्त निघत नाही व फुलांची संख्या कमी मिळते. असंतुलित खत नियोजनामुळे खोड पातळ राहते.
▸ पाने आकाराने लहान असणे व रंग पोपटी राहणे
ज्यावेळेस रोप वाढीच्या अवस्थेत रोपांच्या पानाचा आकार लहान व रंग पोपटी असतो तेव्हा रोपांची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया कमी होते व रोपांची वाढ थांबते. मॅग्नेशियम, नायट्रोजन व इतर अन्नद्रव्यांची कमतरता जाणवल्यामुळे रोपांच्या पानांचा आकार लहान राहतो व रंग फिकट हिरवा किंवा पोपटी होतो.
▸तापमानामुळे पानांच्या वाट्या होतात
जेव्हा तापमान मोठ्या प्रमाणावर वाढतील तेव्हा बाष्पोत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे टोमॅटोच्या कोवळ्या व शेंड्यांच्या पानांच्या वाट्या होतात किंवा पाणी सुरकुतल्यागत होतात.
▸ मुळांची कॉइल होणे
जेव्हा जास्त वयाच्या रोपांची लागवड केली जाते तेव्हा काही कालावधीनंतर अशा रोपांच्या मुळांची कॉइल तयार होते व अन्नद्रव्य शोषण कमी प्रमाणात होते व रोपांच्या पानांच्या वाट्या होतात.