टोमॅटो फळ फुगवणीची अवस्था
Farmspot AgroShare
✅ टोमॅटो फळ फुगवणीची अवस्था हि रोपलागवाडीनंतर 45 ते 50 दिवसांनी सुरू होते .या अवस्थेत येणाऱ्या किडी
मावा
▸मावा हि किड सोंडेच्या साह्याने रसशोषण करतात. अतिप्रमाणात पाने आकसतात व पाने पिवळी पडतात, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया मंदावते व रोपांची वाढ खुंटते. या रसशोषणक कीडींच्या प्रादुर्भावमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
तुडतुडे
▸ या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पाने आकमतात, पानांवर पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात किंवा पानांवर पिवळसर डाग दिसतात. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या असंख्य प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते व विकास थांबतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
पांढरी माशी
▸ या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानाच्या वाट्या होतात, पाने पिवळी पडतात, पानांवर ठिपके दिसतात. यामुळे रोपांवर जैविक ताण येतो. रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या प्रक्रिया असंतुलित होतात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते.
फुलकिडे
▸ या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानांवर बारीक चंदेरी चट्टे पडतात. ज्यामुळे पाने आकसतात, पाने पिवळी पडतात. यामुळे रोपांची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया, विस्कळीत होते. परिणामी रोपांची वाढ खुंटते व विकास थांबतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
नागअळी
▸ या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांच्या पानांवर नागमोडी आकाराचे पांढऱ्या रंगाचे लहान चट्टे दिसतात. ज्यामुळे पानांमधील हरितकणाचे प्रमाण कमी होते व प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते. पानांमधील शिरांणा हानी पोहचते. ज्यामुळे वहन प्रक्रिया विस्कळीत होते. एकंदरीत या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.
टूटा नागअळी
▸ या अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव पानांवर व कोवळ्या शेंड्यावर होतो. पानांवर नागअळी पेक्षा मोठ्या आकाराचे पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात. कालांतराने ते करपतात, शेड्यांवर हि किड पोखरते, ज्यामुळे शेड्यांचे नुकसान होते. एकंदरीत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे वहन प्रक्रिया विस्कळीत होते. प्रकाशसंश्लेषण प्रक्रिय,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया विस्कळीत होते.ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो. झालेल्या जखमांमधून बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. रोपांवर जैविक व अजैविक ताण येतो. एकंदरीत टूटा नागअळीमुळे रोपांची वाढ थांबते.
तंबाखूवरील सुरवंट
▸ हि किड पानांना खाते व फळ पोखरते ज्यामुळे पिकाचे नुकसान होते. रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया विस्कळीत होतात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते.
हॉर्नवॉर्म
▸ हि अळी टोमॅटोच्या कोवळ्या पानांवर खाणे सुरू करते. ज्यामुळे पानांना जखमा होतात. त्यातून बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. पानांचे नुकसान झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया यावर होतो. ज्याचा एकंदरीत परिणाम हा रोपांच्या वाढीवर व विकासावर होतो.
हेलीकोव्हर्पा सुरवंट
▸ हि किड पानांवर खाते व फळ पोखरते, ज्यामुळे नुकसान होते व रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिय,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया असंतुलित होते व ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.
फळ पोखरणारी अळी
▸ हि किड फळांना पोखरते ज्यामुळे फळांचे नुकसान होते. तसेच हि किड पाने सुद्धा खाते, ज्यामुळे पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. पानांचे नुकसान झाल्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया, मंदावत, ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो व फुलांची फुलगळ होते.
लाल कोळी
▸ या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानांवर तपकिरी व पिवळे ठिपके दिसतात. पानांच्या कडा वाकड्या होतात, पानांचा हिरवा रंग कमी होतो पाने पिवळी पडतात. रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया, मंदावते.
✅टोमॅटो रोपांची फळ फुगवणीची अवस्था ही रोप लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी सुरू होते.
टोमॅटो फळधारणेच्या अवस्थेत रोपांच्या वाढीसाठी व रोपांच्या विकासासाठी रोपांच्या पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.
मातीच्या प्रकारानुसार पाणी नियोजन
▸ काळी माती (जाड माती)
या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते व पाण्याचा निचरा कमी प्रमाणात होतो. अशा मातीत 50 दिवसांच्या पुढे रोज 35 ते 40 मिनिटे पाणी द्यावे.
▸ तांबट माती (मध्यम हलकी माती)
या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम असते व पाण्याचा निचरा मध्यम प्रमाणात होतो. अशा मातीत 50 दिवसांच्या पुढे रोज 40 ते 50 मिनिटे पाणी द्यावे.
▸ मुरमाड, वाळूजार माती (हलकी माती)
या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते व पाण्याचा निचरा जास्त प्रमाणात होतो. अशा मातीत रोप लागवडीनंतर 50 दिवसांच्या पुढे रोज 1 तास पाणी द्यावे.
अशा प्रकारे फळ फुगवणीच्या अवस्थेत मातीच्या प्रकारानुसार ठिबकद्वारे पाणी नियोजन करावे.
✅टोमॅटो फळ फुगवणीच्या अवस्थेत रोपांचा विकास खालील प्रमाणे होतो:
▸ टोमॅटो फळ फुगवणीच्या अवस्था ही रोप लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी सुरू होते.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ तंतुमय होते.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांची पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट होणे गरजेचे आहे.
▸ या अवस्थेत नवीन शेंडे व नवीन फुटवे निघणे गरजेचे आहे.
▸ या अवस्थेत रोपांच्या शेंड्यावर नवीन फुलांची निर्मिती होते.
▸ या अवस्थेत फुलांपासून फळधारणा होणे सुद्धा गरजेचे आहे.
▸ या अवस्थेत प्रामुख्याने फळांचा आकार व गुणवत्ता वाढते.
✅ टोमॅटो पिकात फुगवणीच्या अवस्था ही रोप लागवडीनंतर 45 – 50 दिवसांनी सुरू होते. या अवस्थेत टोमॅटो पिकात खालील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.(विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा रसशोषक किडीच्या मार्फत होतो.
▸ CMV (Cucumber mosaic virus)
▸ TLCV (Tomato leaf curl virus)
✅ टोमॅटो फळ फुगवणीची अवस्था हि रोपलागवाडीनंतर 45 ते 50 दिवसांनी सुरू होते .या अवस्थेत येणारे बुरशीजन्य रोग
▸ सेप्टोरिया काळे ठिपके (Septoria lycopersici)
▸ स्टेमफायलियम राखाडी ठिपके (Stemphyllium solani)
▸ भुरी (Oidium lycopersici )
▸ टोमॅटो लीफ मोल्ड (Passalora Fulva)
▸ डाऊनी (Oomycete )
▸ उशिरा येणारा करपा (Phypthora infestans)