टोमॅटो फळ धारणेची अवस्था
Farmspot AgroShare
✅टोमॅटो रोप फळधारणेची अवस्था ही रोप लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी होते.
टोमॅटोच्या फळधारणेच्या अवस्थेत रोपांचा विकास खालील प्रमाणे होतो :
▸ टोमॅटो रोप फळधारणेची अवस्था ही रोप लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी होते.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांची पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट असणे गरजेचे आहे.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते.
▸ या अवस्थेत फुलांपासून फळधारणा होत असते.
✅या अवस्थेत येणारे बुरशिजन्य रोग
टोमॅटो फळ धारणेची अवस्था ही रोप लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांच्या दरम्यान असते. या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात.
▸ उशिरा येणारा करपा (Phypthora infestans)
▸ लवकर येणारा करपा (Alternaria solani)
▸ टोमॅटो लीफ मोल्ड (Passalora Fulva
▸ भुरी (odium neolycoperisici)
▸ सेप्टोरिया काळे ठिपके (Septoria lycopersici)
▸ स्टेमफायलियम राखाडी ठिपके (Stemphyllium solani)
▸ डाऊनी(Oomycete)
✅या अवस्थेत येणारे विषाणूजन्य रोग
टोमॅटो रोप वाढीची आवस्था ही रोप लागावडीनंतर 15 ते 35 दिवसांच्या दरम्यान असते. या अवस्थेत खालील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. (विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा रसशोषक किडीच्या मार्फत होतो.
▸ CMVC (Cucumber mozaic virus)
▸TLCVC (Tomato leaf curl virus)
✅या अवस्थेत येणाऱ्या किडी
▸ मावा
मावा हि किड सोंडेच्या साह्याने रसशोषण करतात. अतिप्रमाणात पाने आकसतात व पाने पिवळी पडतात, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया मंदावते व रोपांची वाढ खुंटते. या रसशोषणक कीडींच्या प्रादुर्भावमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
▸ तुडतुडे
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पाने आकमतात, पानांवर पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात किंवा पानांवर पिवळसर डाग दिसतात. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या असंख्य प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते व विकास थांबतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
▸ पांढरी माशी
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानाच्या वाट्या होतात, पाने पिवळी पडतात, पानांवर ठिपके दिसतात. यामुळे रोपांवर जैविक ताण येतो. रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या प्रक्रिया असंतुलित होतात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते.
▸ नागअळी
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांच्या पानांवर नागमोडी आकाराचे पांढऱ्या रंगाचे लहान चट्टे दिसतात. ज्यामुळे पानांमधील हरितकणाचे प्रमाण कमी होते व प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते. पानांमधील शिरांणा हानी पोहचते. ज्यामुळे वहन प्रक्रिया विस्कळीत होते. एकंदरीत या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.
▸ टुटा नागअळी
या अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव पानांवर व कोवळ्या शेंड्यावर होतो. पानांवर नागअळी पेक्षा मोठ्या आकाराचे पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात. कालांतराने ते करपतात, शेड्यांवर हि किड पोखरते, ज्यामुळे शेड्यांचे नुकसान होते. एकंदरीत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे वहन प्रक्रिया विस्कळीत होते. प्रकाशसंश्लेषण प्रक्रिय,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया विस्कळीत होते.ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो. झालेल्या जखमांमधून बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. रोपांवर जैविक व अजैविक ताण येतो. एकंदरीत टूटा नागअळीमुळे रोपांची वाढ थांबते.
▸टोमॅटो हॉर्नवॉर्म
हि अळी टोमॅटोच्या कावळया पानांवर खाणे सुरू करते. ज्यामुळे पानांना जखमा होतात. त्यातून बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. पानांचे नुकसान झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया यावर होतो. ज्याचा एकंदरीत परिणाम हा रोपांच्या वाढीवर व विकासावर होतो.
▸ हेलीकोव्हर्पा सुरवंट
हि किड पानांवर खाते व फळ पोखरते, ज्यामुळे नुकसान होते व रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिय,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया असंतुलित होते व ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.
▸ फळ पोखरणारी अळी
हि किड फळांना पोखरते ज्यामुळे फळांचे नुकसान होते. तसेच हि किड पाने सुद्धा खाते, ज्यामुळे पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. पानांचे नुकसान झाल्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया, मंदावत, ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो व फुलांची फुलगळ होते.
✅या अवस्थेत येणाऱ्या इतर अडचणी
▸ रोपांवर जैविक व अजैविक ताण येणे.
या अवस्थेत फुलांपासून फळधारणा होत असते. अशातच तापमान, आद्रता, उष्णता, वारे, पाऊस यांसारख्या पर्यावरणीय घटकांमुळे रोपांवर अजैविक ताण येतो. तसेच किडी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे रोपांवर जैविक ताण येतो. ज्यामुळे या अवस्थेत होणारी रोपांची वाढ व विकास थांबतो.
▸ फूल गळ होणे.
या अवस्थेत फुलांपासून फळधारणा होत असते. या अवस्थेत जर का रोपांवर जैविक किंवा अजैविक ताण आला तर फुलांची फुलगळ मोठ्या प्रमाणावर होते.तसेच या अवस्थेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, पोटॅश, झिंक या सारख्या अन्नद्रव्यांची कमतरता भासली तरी मोठ्या प्रमाणावर फुलगळ होते.
▸ फळधारणा न होणे
या अवस्थेत फुलांपासून फळधारणा होत असताना, जर रोपांवर जैविक व अजैविक ताण आला तर रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया (प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया) मंदावतात व त्यामुळे फळधारणा होण्यासाठी ऊर्जा मिळत नाही. परिणामी ज्या फुलांपासून ठराविक वेळेत फळधारणा झाली नाही अशा फुलांची फुलगळ होते. तसेच टोमॅटो पानांच्या वाट्या होणे, मुळांची कॉईल होणे, अन्नद्रव्य कमतरता निर्माण होणे, यांसारख्या अडचणीमुळे सुद्धा फळधारणा होत नाही.
▸ पानांचा आकार कमी असणे व पानांचा रंग फिकट हिरवा व पोपटी होणे.
या अवस्थेत फुलांपासून फळधारणा होत असते, या अवस्थेत प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून जे अन्न तयार होते, त्याचे ऊर्जात रूपांतर केले जाते व ती ऊर्जा प्राथमिकरित्या फळधारणेसाठी वापरली जाते. अशातच मॅग्नेशियम, सल्फर, नायट्रोजन, फॉस्फरस, झिंक या अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण झाली तर पानांचा आकार हा लहान होतो व रंग फिकट हिरवा राहतो.
▸ तापमानामुळे पानांच्या वाट्या होतात
या अवस्थेत तापमान वाढल्यामुळे पानांद्वारे बाष्पोत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे पानांच्या वाट्या होतात व त्याचा थेट परिणाम रोपांच्या फळधारणेवर होतो.
▸ मुळांची कॉईल होणे
जास्त वयाच्या रोपांची लागवड केल्यानंतर मुळांची कॉईल तयार होते. जेव्हा फळधारणेची अवस्था येते तेव्हा अन्नद्रव्य कमतरता निर्माण होते. ज्यामुळे पानांच्या वाट्या होणे, रोप एकदम सुकणे, फुलगळ होते व फळधारणा होत नाही.
▸ अन्नद्रव्य कमतरता निर्माण होणे
या अवस्थेत नाइट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, झिंक यांसारख्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसतात.