टोमॅटो फूल अवस्था
Farmspot AgroShare
✅टोमॅटो फूल अवस्था ही टोमॅटो रोप लागवडीनंतर 35 दिवसांनी सुरू होते.टोमॅटो फुल अवस्थेत रोपांचा विकास व वाढ खालीलप्रमाणे होतो
▸ ही अवस्था टोमॅटो रोप लागवडीनंतर 35 दिवसांनी सुरू होते.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांची पाने रुंद, पसरट, जाड असणे गरजेचे आहे.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांना नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात.
▸ या अवस्थेत नवीन फुलांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते.
✅टोमॅटो पिकात फूल अवस्थेत खालील बुरशिजन्य रोग येतात.
▸ रोपमर (Didymella lycopersici )
▸ रोपमर (Fusarium Oxysporum)
▸ लवकर येणारा करपा (Alternaria solani)
▸ सेप्टोरिया काळे ठिपके (Septoria lycopersici)
▸ स्टेमफायलियम राखाडी ठिपके(Stemphyllium solani)
▸ भुरी (Oidium lycopersici )
✅या अवस्थेत येणारे जिवाणूजन्य रोग
टोमॅटो रोपांची फूलअवस्था ही रोप लागवडीनंतर 35 दिवसांनी सुरू होते व फुलांचा पहिला फ्लश हा 40 ते 45 दिवसांच्या दरम्यान येतो. या अवस्थेत खालील जिवाणूजन्य रोग येतात.
▸ जिवाणूजन्य काळे ठिपके (Xanthomonas spp. & Pseudomonas syringae)
▸ जिवाणूजन्य करपा (Xanthomonas spp. & Pseudomonas syringae)
▸ जिवाणूजन्य मर (Xanthomonas spp. & Pseudomonas syringae)
✅या अवस्थेत येणारे विषाणूजन्य रोग
टोमॅटो पिकत फूल अवस्था ही रोप लागवडीनंतर 30 - 45 दिवसांच्या दरम्यान असते. या अवस्थेत खालील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. (विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा रसशोषक किडीच्या मार्फत होतो.)
▸CMV (Cucumber mosaic virus)
▸TLCV (Tomato leaf curl virus)
✅या अवस्थेत येणाऱ्या किडी
▸मावा
मावा हि किड सोंडेच्या साह्याने रसशोषण करतात. अतिप्रमाणात पाने आकसतात व पाने पिवळी पडतात, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया मंदावते व रोपांची वाढ खुंटते. या रसशोषणक कीडींच्या प्रादुर्भावमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
▸ तुडतुडे
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पाने आकमतात, पानांवर पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात किंवा पानांवर पिवळसर डाग दिसतात. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या असंख्य प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते व विकास थांबतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
▸ पांढरी माशी
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानाच्या वाट्या होतात, पाने पिवळी पडतात, पानांवर ठिपके दिसतात. यामुळे रोपांवर जैविक ताण येतो. रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या प्रक्रिया असंतुलित होतात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते.
▸फुलकिडे
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानांवर बारीक चंदेरी चट्टे पडतात. ज्यामुळे पाने आकसतात, पाने पिवळी पडतात. यामुळे रोपांची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया, विस्कळीत होते. परिणामी रोपांची वाढ खुंटते व विकास थांबतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
▸नागअळी
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांच्या पानांवर नागमोडी आकाराचे पांढऱ्या रंगाचे लहान चट्टे दिसतात. ज्यामुळे पानांमधील हरितकणाचे प्रमाण कमी होते व प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते. पानांमधील शिरांणा हानी पोहचते. ज्यामुळे वहन प्रक्रिया विस्कळीत होते. एकंदरीत या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.
▸टुटा नागअळी
या अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव पानांवर व कोवळ्या शेंड्यावर होतो. पानांवर नागअळी पेक्षा मोठ्या आकाराचे पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात. कालांतराने ते करपतात, शेड्यांवर हि किड पोखरते, ज्यामुळे शेड्यांचे नुकसान होते. एकंदरीत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे वहन प्रक्रिया विस्कळीत होते. प्रकाशसंश्लेषण प्रक्रिय,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया विस्कळीत होते.ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो. झालेल्या जखमांमधून बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. रोपांवर जैविक व अजैविक ताण येतो. एकंदरीत टूटा नागअळीमुळे रोपांची वाढ थांबते.
▸ हॉर्नवॉर्म
हि अळी टोमॅटोच्या कोवळ्या पानांवर खाणे सुरू करते. ज्यामुळे पानांना जखमा होतात. त्यातून बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. पानांचे नुकसान झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया यावर होतो. ज्याचा एकंदरीत परिणाम हा रोपांच्या वाढीवर व विकासावर होतो.
▸ हेलीकोव्हर्पा सुरवंट
हि किड पानांवर खाते ,ज्यामुळे नुकसान होते व रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिय,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया असंतुलित होते व ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.
✅या अवस्थेत येणाऱ्या इतर अडचणी
टोमॅटो पिकाची फुल अवस्था आहे रोप लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांच्या पुढे चालू होते. या अवस्थेत खालील अडचणी येतात.
▸रोपांवर येणारा जैविक व अजैविक ताण
या अवस्थेत तापमान, उष्णता, आद्रता, पाऊस, वारे, व इतर पर्यावरणीय घटकांमुळे रोपांवर अजैविक असा ताण येतो. तर या अवस्थेत रोपांची प्रतिकारशक्ती कमी असते, यामुळे रोपांवर किडी, बुरशीजन्य रोग, जिवाणूजन्य रोग व विषाणूजन्य रोग यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
ज्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो. व रोपांच्या अंतर्गत प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या प्रक्रिया मंदावतात. व रोपांची वाढ व विकास थांबतो.
रोपांची पाने आकाराने लहान फिकट हिरव्या किंवा पोपटी रंगाची होतात
▸अन्नद्रव्यांची कमतरता
या अवस्थेत रोपांना मॅग्नेशियम, नाइट्रोजन, फॉस्फरस व इतर अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास रोपांच्या पानांचा आकार लहान होतो, पाने फिकट हिरवी किंवा पोपटी होतात. परिणामी रोपांची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया मंदावते, रोपांची वाढ व विकास थांबतो.
▸फुलांची संख्या कमी असणे
रोप वाढीच्या अवस्थेत जर रोपांच्या खोडाची जाडी कमी असेल, रोपांची शाखीय वाढ कमी झाली असेल तर फुलांची संख्या ही कमी असते.
▸फुलांची संख्या जास्त असणे
रोप वाढीच्या अवस्थेत रोपांची शाखीय वाढ मध्यम स्वरूपाची झाली असेल व फुलवस्थेत जर का पाण्याचा ताण जास्त प्रमाणात दिला गेला, तर फुलांची संख्या जास्त प्रमाणात येते. ज्यामुळे त्या अवस्थेत रोपांची वाढ व विकास पूर्णपणे थांबतो. पानांच्या वाट्या होयला सुरुवात होते, नवीन पानांची निर्मिती थांबते.
▸ फुलगळ होणे
या अवस्थेत जर का रोपांवर जैविक किंवा अजैविक ताण आला तर मोठ्या प्रमाणावर फुलांची फुलगळ होते.त्याचबरोबर झिंक, कॅल्शियम, पोटॅश यांसारख्या अन्नद्रव्यांची कमतरता जर का भासली तरीही फुलगळ होते. रोपांवर जर किडी, बुरशीजन्य रोग, जीवाणूजन्य रोग किंवा विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला तरी फुलगळ मोठ्या प्रमाणावर होते.
▸ तापमानामुळे पानांच्या वाट्या होणे
या अवस्थेत जर का तापमान वाढले तर पानांद्वारे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते व त्यामुळे पानांच्या वाट्या होतात.
▸ मुळांची कॉइल होणे
जर का जास्त वयाच्या रोपांची लागवड केली तर अशा रोपांच्या मुळांची कॉईल तयार होते. त्यामुळे पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येतात व रोपांची वाढ खुंटते.