टोमॅटो पिकात कॅल्शियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे कारणे नुकसान आणि उपाययोजना.

Farmspot Agro

✅ लक्षणे

▸ टोमॅटो फळांच्या तळ भागावर काळा किंवा तपकिरी रंगाचा भाग दिसतो, त्याला ब्लॉसयम एंड रॉट असे म्हणतात.
▸ रोपांच्या पानांवर पिवळे चटृटे दिसतात आणि पाने सुकल्यासरखी होतात.
▸ जुन्या पानांच्या वाट्या होतात, आणि पानांच्या कडा तपकिरी रंगाच्या होतात.
▸ रोपांवर नवीन वाढ खुंटते आणि कोवळ्या पानांची वाढ थांबते.

✅ कारणे

▸ मातीमध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम कमी असल्यामुळे कॅल्शियमची कमतरता जाणवते. कमी किंवा जास्त प्रमाणात पाणी दिल्यास कॅल्शियमची उपलब्धता कमी होते. pH कमी असलेल्या मातीमध्ये कॅल्शियमची उपलब्धता कमी असते.
▸ नत्रयुक्त खते जास्त प्रमाणात वापरल्यामुळे कॅल्शियम शोषणावर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे कॅल्शियमची कमतरता भासते.

✅ नुकसान

▸ ब्लॉसम एंड रॉटमुळे फळांची गुणवत्ता कमी होते आणि फळे विक्रीयोग्य राहत नाहीत.
▸ खराब झालेली फळे विक्रीसाठी घेतली जात नाहीत, त्यामुळे उत्पन्न कमी होते.
▸ कॅल्शियमच्या कमतरतेमुळे रोपांची एकूण वाढ आणि विकास खुंटतो.

✅ उपाययोजना

▸ कॅल्शियमयुक्त खतांचा वापर करावा, उदा. कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम अमोनियम नायट्रेट.
▸ रोपांच्या पानांवर फोलियर स्प्रे (जसे की कॅल्शियम क्लोराइड) ची फवारणी करावी.
▸ पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. पिकांच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
▸ मातीचे परीक्षण करून घ्यावे.
▸ जर माती अम्लीय असेल तर चुनखडी किंवा डोलोमाइट वापरून मातीचा pH संतुलित करावा.
▸ नत्रयुक्त खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा, त्यामुळे कॅल्शियमचे शोषण योग्य प्रकारे होईल.



Back to blog