टोमॅटो वाढीसाठी योग्य प्रकारच्या मातीची निवड.

Farmspot Agro

टोमॅटोच्या उत्तम वाढीसाठी योग्य प्रकारच्या मातीची निवड करणे गरजेचे आहे. यामध्ये मातीचे भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्म हे टोमॅटो रोपांच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक असतात.

✅ जमिनीचा प्रकार

▸ जमिनीची निवड करताना उत्तम निचरा होणारी, हलकी किंवा मध्यम प्रकारची असावी.
▸ उन्हाळी लागवडीसाठी पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असणारी जमीन निवडावी. (काळी माती, तांबट माती)
▸ हिवाळी लागवडीसाठी पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असणारी जमीन निवडावी. (काळी माती, तांबट माती)
▸ पावसाळी लागवडीसाठी पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणारी जमीन निवडावी. (तांबट माती, मुरमाड माती)

✅ जमिनीचा सेंद्रिय कर्ब

▸ जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा चांगला असावा, जेणेकरून मुळांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होईल.
▸ जमिनीचा सेंद्रिय कर्ब व प्रमाण हे 0.5% ते 1% एवढे असावे.
▸ चांगल्या प्रकारे टोमॅटो उत्पादन घेण्यासाठी 1% ते 2% सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असणाऱ्या जमिनीची निवड करावी.
▸ ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.5% पेक्षा कमी आहे अशा जमिनीत टोमॅटो लागवड करणे टाळावे.

✅ जमिनीचा सामु

▸ ज्या जमिनीला pH 6 ते 7 च्या दरम्यान आहे अशा जमिनीची निवड लागवडीसाठी करावी.
▸ ज्या जमिनीचा pH हा 6 पेक्षा कमी असतो, अशा जमिनी या आम्लीय असतात व अशा जमिनीत टोमॅटो रोपांची लागवड करू नये.
▸ ज्या जमिनीचा pH हा 7.5 पेक्षा जास्त असतो, अशा जमिनीमध्ये सुद्धा टोमॅटो रोपांची लागवड करू नये.
▸ जमिनीचा pH अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर थेट परिणाम करतो.

✅ क्षारयुक्त जमीन

▸ ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असते, अशी जमिनीची निवड टोमॅटो लागवडीसाठी करू नये.
▸ तुमच्या शेताची गुणवत्ता समजून घेण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे.

Back to blog