टोमॅटो रोप फळधारणेच्या अवस्थेत असताना येणाऱ्या अडचणी.
Farmspot AgroShare
रोपांवर जैविक व अजैविक ताण येणे.
▸ या अवस्थेत फुलांपासून फळधारणा होत असते. अशातच तापमान, आद्रता, उष्णता, वारे, पाऊस यांसारख्या पर्यावरणीय घटकांमुळे रोपांवर अजैविक ताण येतो.
▸तसेच किडी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे रोपांवर जैविक ताण येतो. ज्यामुळे या अवस्थेत होणारी रोपांची वाढ व विकास थांबतो.
फूल गळ होणे.
▸ या अवस्थेत फुलांपासून फळधारणा होत असते. या अवस्थेत जर का रोपांवर जैविक किंवा अजैविक ताण आला तर फुलांची फुलगळ मोठ्या प्रमाणावर होते.
▸ तसेच या अवस्थेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, पोटॅश, झिंक या सारख्या अन्नद्रव्यांची कमतरता भासली तरी मोठ्या प्रमाणावर फुलगळ होते.
फळधारणा न होणे
▸ या अवस्थेत फुलांपासून फळधारणा होत असताना, जर रोपांवर जैविक व अजैविक ताण आला तर रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया (प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया) मंदावतात व त्यामुळे फळधारणा होण्यासाठी ऊर्जा मिळत नाही. परिणामी ज्या फुलांपासून ठराविक वेळेत फळधारणा झाली नाही अशा फुलांची फुलगळ होते.
▸ तसेच टोमॅटो पानांच्या वाट्या होणे, मुळांची कॉईल होणे, अन्नद्रव्य कमतरता निर्माण होणे, यांसारख्या अडचणीमुळे सुद्धा फळधारणा होत नाही.
पानांचा आकार कमी असणे व पानांचा रंग फिकट हिरवा व पोपटी होणे.
▸ या अवस्थेत फुलांपासून फळधारणा होत असते, या अवस्थेत प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून जे अन्न तयार होते, त्याचे ऊर्जात रूपांतर केले जाते व ती ऊर्जा प्राथमिकरित्या फळधारणेसाठी वापरली जाते. अशातच मॅग्नेशियम, सल्फर, नायट्रोजन, फॉस्फरस, झिंक या अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण झाली तर पानांचा आकार हा लहान होतो व रंग फिकट हिरवा राहतो.
तापमानामुळे पानांच्या वाट्या होतात
▸ या अवस्थेत तापमान वाढल्यामुळे पानांद्वारे बाष्पोत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे पानांच्या वाट्या होतात व त्याचा थेट परिणाम रोपांच्या फळधारणेवर होतो.
मुळांची कॉईल होणे
▸ जास्त वयाच्या रोपांची लागवड केल्यानंतर मुळांची कॉईल तयार होते. जेव्हा फळधारणेची अवस्था येते तेव्हा अन्नद्रव्य कमतरता निर्माण होते. ज्यामुळे पानांच्या वाट्या होणे, रोप एकदम सुकणे, फुलगळ होते व फळधारणा होत नाही.
अन्नद्रव्य कमतरता निर्माण होणे
▸ या अवस्थेत नाइट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, झिंक यांसारख्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसतात.