टोमॅटो रोप रुझण्याच्या अवस्थेत येणाऱ्या किडी व त्यामुळे होणारे पिकांचे नुकसान.
Farmspot AgroShare
मावा
▸ मावा हि किड सोंडेच्या साह्याने रसशोषण करतात. त्यामुळे अतिप्रमाणात पाने आकसतात व पाने पिवळी पडतात,ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया मंदावते व रोपांची वाढ खुंटते..
▸ या रसशोषण कीडींच्या प्रादुर्भावमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
तुडतुडे
▸ या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पाने आकसतात,
▸ पानांवर पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात.किंवा पानांवर पिवळसर डाग दिसतात. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया यांसारख्या असंख्य प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते व विकास थांबतो.
▸ या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
पांढरी माशी
▸ या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानाच्या वाट्या होतात, पाने पिवळी पडतात, पानांवर ठिपके दिसतात. यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
▸ रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या प्रक्रिया असंतुलित होतात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते.
नागअळी
▸ या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांच्या पानांवर नागमोडी आकाराचे पांढऱ्या रंगाचे लहान चट्टे दिसतात. ज्यामुळे पानांमधील हरितकणाचे प्रमाण कमी होते. व प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते.
▸ पानांमधील शिरांणा हानी पोहचते. ज्यामुळे वहन प्रक्रिया विस्कळीत होते.
▸ एकंदरीत या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.
काळी कुरतडणारी अळी
▸ हि किड रोपांचे खोड जमिनीलगत कट करते. ज्यामुळे त्या जागेचे रोप बदलायला लागते.
हेलीकोव्हर्पा सुरवंट
▸ हि किड पानांवर खाते व फळ पोखरते ज्यामुळे नुकसान होते व रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिय, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया असंतुलित होते व ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.