टोमॅटो रोप फळ तोडणीच्या अवस्थेत असताना येणाऱ्या किडी व त्यामुळे होणारे नुकसान.

Farmspot Agro
मावा

▸ मावा हि किड सोंडेच्या साह्याने रसशोषण करतात. अतिप्रमाणात पाने आकसतात व पाने पिवळी पडतात, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया मंदावते व रोपांची वाढ खुंटते. या रसशोषण कीडींच्या प्रादुर्भावमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.

तुडतुडे

▸ या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पाने आकसतात, पानांवर पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. किंवा पानांवर पिवळसर डाग दिसतात. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या असंख्य प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते व विकास थांबतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.

पांढरी माशी

▸ या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानांच्या वाट्या होतात, पाने पिवळी पडतात, पानांवर ठिपके दिसतात. यामुळे रोपांवर जैविक ताण येतो. रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या प्रक्रिया असंतुलित होतात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते.

फूल किडे

▸ या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानांवर बारीक चंदेरी चट्टे पडतात. ज्यामुळे पाने आकसतात, पाने पिवळी पडतात. यामुळे रोपांची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया, विस्कळीत होते. परिणामी रोपांची वाढ खुंटते व विकास थांबतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.

नागअळी

▸ या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांच्या पानांवर नागमोडी आकाराचे पांढऱ्या रंगाचे लहान चट्टे दिसतात. ज्यामुळे पानांमधील हरितकणाचे प्रमाण कमी होते. व प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते. पानांमधील शिरांणा हानी पोहचते. ज्यामुळे वहन प्रक्रिया विस्कळीत होते. एकंदरीत या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  रोपांची वाढ व विकास थांबतो.

टुटा नागअळी

▸ या अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव पानांवर व कोवळ्या शेंड्यावर होतो. पानांवर नागअळी पेक्षा मोठ्या आकाराचे पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात. कालांतराने ते करपतात, शेड्यांवर हि किड पोखरते, ज्यामुळे शेड्यांचे नुकसान होते. एकंदरीत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे वहन प्रक्रिया विस्कळीत होते. प्रकाशसंश्लेषण प्रक्रिय,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया विस्कळीत होते. ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो. झालेल्या जखमांमधून बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. रोपांवर जैविक व अजैविक ताण येतो. एकंदरीत टूटा नागअळीमुळे रोपांची वाढ थांबते.

लीफ हॉर्नवॉर्म

▸ हि अळी टोमॅटोच्या कोवळया पानांवर खाणे सुरू करते. ज्यामुळे पानांना जखमा होतात. त्यातून बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. पानांचे नुकसान झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया यावर होतो. ज्याचा एकंदरीत परिणाम हा रोपांच्या वाढीवर व विकासावर होतो.  

 फळ पोखरणारी अळी

▸ हि किड फळांना पोखरते ज्यामुळे फळांचे नुकसान होते. तसेच हि किड पाने सुद्धा खाते, ज्यामुळे फळांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. पानांचे नुकसान झाल्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया, मंदावते ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो. व फुलांची फुलगळ होते.

लाल कोळी

▸ या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानांवर तपकिरी व पिवळे ठिपके दिसतात.पानांच्या कडा वाकड्या होतात, पानांचा हिरवा रंग कमी होतो पाने पिवळी पडतात. रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया, मंदावते.

तंबाखूवरील सुरवंट

▸ हि किड पानांना खाते व फळ पोखरते ज्यामुळे पिकाचे नुकसान होते. रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया विस्कळीत होतात, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते.

हेलीकोव्हर्पा सुरवंट

▸ हि किड पानांवर खाते व फळ पोखरते ज्यामुळे नुकसान होते व रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिय, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया असंतुलित होते व ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.


 

Back to blog