टोमॅटो पिकात रोप रुझण्याच्या अवस्थेत येणाऱ्या इतर अडचणी
Farmspot AgroShare
टोमॅटो पिकाची रोप रुझण्याची अवस्था हि रोप लागवडीनंतर पहिले 15 दिवस असते. या अवस्थेत खालील अडचणी येतात.
रोपांची मर होते
▸ टोमॅटो पिकात सुरुवातीच्या टप्प्यात पिथियम सारख्या बुरशीमुळे रोपांची मर होते.
▸ उन्हाळ्यामध्ये टोमॅटो लागवड केली असेल व मल्चिंग पेपरचा वापर केला असेल तर मल्चिंग मधील गरम वाफ रोपांवर येते व रोपांची मर होते.
रोपांवर अजैविक ताण येतो
▸ टोमॅटो रोपांची पुर्नलागवड केल्यानंतर रोपांवर पुर्नलागवडीचा ताण येतो.
रोपे लवकर सेट होत नाहीत
▸ रोपांची लागवड केल्यानंतर पहिले 15 दिवसांचा कालावधी रोपे सेट होण्याचा असतो. या कालावधीत रोपे मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत वाढ करतात व त्यानंतर दोन पानांचा शेंडा येतो, परंतु काही परिस्थितीमध्ये रोपांची मुळे कोकोपीट बाहेर जमिनीत वाढत नाहीत व त्यामुळे रोपे पिवळी पडतात.
गरजेपेक्षा पाणी जास्त होणे
▸ या अवस्थेत रोपांची मुळे जमिनीत जास्त वाढत नाहीत. त्यामुळे त्यांना ठिबकद्वारे जास्त पाणी न देता आळवणीद्वारे पोषक द्रव्य देणे गरजेचे आहे. परंतु रोपे पिवळी पडल्यामुळे बरेच शेतकरी जास्त पाणी देतात, परंतु यामुळे रोपांची मर होणे चालू होते.
गरजेपेक्षा कमी पाणी देणे
▸ जेव्हा रोपांची लागवड केली जाते, तेव्हा त्या रोपांना जर का गरजेपेक्षा कमी पाणी दिले तर रोपे सुकण्यास सुरुवात होते.
रोपे पिवळी पडणे
▸ जेव्हा सुरुवातीच्या टप्यात रोपांची लागवड केली जाते व रोपे लवकर सेट होत नाहीत. अशा वेळी जमिनीतून अन्नद्रव्य शोषण करू शकत नाहीत व अन्नद्रव्य कमतरतेमुळे रोपे पिवळी पडतात.