टोमॅटो रोप फुल अवस्थेत असताना येणाऱ्या इतर अडचणी
Farmspot AgroShare
टोमॅटो पिकाची फुल अवस्था लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांच्या पुढे चालू होते. या अवस्थेत खालील अडचणी येतात.
रोपांवर येणारा जैविक व अजैविक ताण
▸ या अवस्थेत तापमान, उष्णता, आद्रता, पाऊस, वारे, व इतर पर्यावरणीय घटकांमुळे रोपांवर अजैविक असा ताण येतो. तर या अवस्थेत रोपांची प्रतिकारशक्ती कमी असते, यामुळे रोपांवर किडी, बुरशीजन्य रोग, जिवाणूजन्य रोग व विषाणूजन्य रोग यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
▸ ज्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो. व रोपांच्या अंतर्गत प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या प्रक्रिया मंदावतात. व रोपांची वाढ व विकास थांबतो.
रोपांची पाने आकाराने लहान फिकट हिरव्या किंवा पोपटी रंगाची होतात
▸ या अवस्थेत रोपांना मॅग्नेशियम, नाइट्रोजन, फॉस्फरस व इतर अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास रोपांच्या पानांचा आकार लहान होतो, पाने फिकट हिरवी किंवा पोपटी होतात. परिणामी रोपांची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया मंदावते, रोपांची वाढ व विकास थांबतो.
फुलांची संख्या कमी असणे
▸ रोप वाढीच्या अवस्थेत जर रोपांच्या खोडाची जाडी कमी असेल, रोपांची शाखीय वाढ कमी झाली असेल तर फुलांची संख्या ही कमी असते.
फुलांची संख्या जास्त असणे
▸ रोप वाढीच्या अवस्थेत रोपांची शाखीय वाढ मध्यम स्वरूपाची झाली असेल व फुलवस्थेत जर का पाण्याचा ताण जास्त प्रमाणात दिला गेला, तर फुलांची संख्या जास्त प्रमाणात येते. ज्यामुळे त्या अवस्थेत रोपांची वाढ व विकास पूर्णपणे थांबतो. पानांच्या वाट्या होयला सुरुवात होते, नवीन पानांची निर्मिती थांबते.
फुलगळ होणे
▸ या अवस्थेत जर का रोपांवर जैविक किंवा अजैविक ताण आला तर मोठ्या प्रमाणावर फुलांची फुलगळ होते. त्याचबरोबर झिंक, कॅल्शियम, पोटॅश यांसारख्या अन्नद्रव्यांची कमतरता जर का भासली तरीही फुलगळ होते.
▸ रोपांवर जर किडी, बुरशीजन्य रोग, जीवाणूजन्य रोग किंवा विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला तरी फुलगळ मोठ्या प्रमाणावर होते.
तापमानामुळे पानांच्या वाट्या होणे
▸ या अवस्थेत जर का तापमान वाढले तर पानांद्वारे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते व त्यामुळे पानांच्या वाट्या होतात.
मुळांची कॉइल होणे
▸ जर का जास्त वयाच्या रोपांची लागवड केली तर अशा रोपांच्या मुळांची कॉईल तयार होते. त्यामुळे पानांच्या वाट्या होणे यांसारख्या अडचणी येतात व रोपांची वाढ खुंटते.