टोमॅटो व्हरायटीची निवड करताना कशाच्या आधारावर करावी?

Farmspot Agro

टोमॅटो उत्पादन यशस्वीपणे घेण्यासाठी टोमॅटो व्हरायटीची निवड करताना विविध परिस्थितींच्या घटकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.तुम्ही व्हरायटी निवड करताना खालील निकषांच्या आधारावर करावी.

हंगाम  


▸
तुम्ही कोणत्या हंगामा टोमॅटो लागवड करणार आहे, त्या हंगामात हवामान कसे असते याची माहिती घ्यावी व त्यानुसार टोमॅटो व्हरायटी निवड करावी. महाराष्ट्रामध्ये खरिप (पावसाळी), रब्बी (हिवाळी व उन्हाळी) हंगामात टोमॅटो लागवड केली जाते व या तिन्ही हंगामात हवामान (तापमान, आद्रता, पाऊस) वेगवेगळे असते. या हवामानात चांगल्या प्रकारे वाढ होणाऱ्या, फुलांची संख्या चांगल्या प्रकारे असणाऱ्या व फळधारणा चांगल्या प्रकारे होणाऱ्या, फळांचा आकार चांगल्या प्रकारे होणाऱ्या व्हरायटीची निवड लागवडीसाठी करावी. जर तुम्ही हिवाळी हंगामाच्या शेवटी लागवड करत असाल तर तुम्ही उन्हाळी टोमॅटो व्हरायटीची लागवड करावी.जेणेकरून तापमान वाढीमुळे पानांच्या  वाट्या होणे यासारख्या अडचणी येणार नाहीत.

मार्केट 


▸
तुम्ही टोमॅटो लागवड कोणत्या मार्केटसाठी करणार आहे याच्या आधारावर टोमॅटो व्हरायटीची निवड करावी. काही टोमॅटो व्हरायटीची फळे ही दीर्घकाळ चांगली राहू शकतात.जर आपले मार्केट आपल्या शेतापासून 400 ते 500 km असेल तर अशा टोमॅटो व्हरायटीची लागवडीसाठी निवड करावी.

फळांचे वजन आणि आकार


▸
महाराष्ट्रात प्रामुख्याने गोल आकाराच्या व अंडाकृती आकाराच्या टोमॅटो व्हरायटींची लागवड केली जाते. तर काही व्हरायटींच्या फळांचा आकार हा 80 ते 100 ग्रॅम असतो, तर काही व्हरायटींच्या फळांचा आकार हा 100 ते 120 ग्रॅम असतो. याचा अभ्यास तुम्ही व्हरायटीची निवड करायची आहे.

बुरशीजन्य रोग प्रतिकारक व्हरायटी 


▸
हंगामानुसार व्हरायटीची निवड करताना पावसाळी वातावरणात सततचा पाऊस, ओलावा यामुळे विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. तर हिवाळी व उन्हाळी वातावरणात जास्तीची आद्रता व तापमान वाढ यामुळे रोपमर, भुरी यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे व्हरायटी निवड करताना बुरशीजन्य रोगास प्रतिरोधक व्हरायटींची निवड करावी.जेणेकरून रासायनिक बुरशीनाशकांचा  खर्च कमी होतो व उत्पादन खर्चात कपात होते.

विषाणूजन्य रोग प्रतिकारक व्हारायटी 


▸
टोमॅटो पिकात प्रामुख्याने टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस (TLCV) व कुकुंबर मोझाइक व्हायरस (CMV) या दोन विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे टोमॅटो व्हरायटीची निवड करताना या विषाणूजन्य रोगास प्रतिरोधक असणाऱ्या टोमॅटो व्हरायटींची निवड करावी.

तोडणीचा कालावधी


▸
काही टोमॅटो व्हरायटी या लागवडीनंतर 60 ते 65  दिवसांनी तोडणीस येतात.काही व्हरायटी या 65 ते 70  दिवसांनी तोडणीस येतात, तर काही व्हरायटी या 70 ते 75  दिवसांनी तोडणीस येतात. तसेच हवामान हे सुद्धा तोडणीचा कालावधी कमी किंवा जास्त करू शकते, त्यामुळे व्हरायटीची निवड करताना तोडणीचा कालावधी लक्षात घ्यावा.

व्हरायटीविषयी शेतकऱ्यांचे अनुभव 


▸
तुम्ही ज्या टोमॅटो व्हरायटीची निवड करणार आहात त्या व्हरायटी विषयी मागील हंगामात त्या टोमॅटो व्हरायटीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांकडून त्यावर व्हरायटीचे सकारात्मक व नकारात्मक मुद्दे जाणून घ्या, जेणेकरून सुरुवातीपासून उपाययोजना करण्यास सोपे जाईल.
उदा: आर्यमान टोमॅटो फळांची साइज  होत नाही. 

Back to blog