टोमॅटो रोपे सेट झाली आहेत का हे कसे ओळखावे?

Farmspot Agro

टोमॅटो रोपे सेट झाली आहेत का हे पाहण्यासाठी रोप लागवडीनंतर  5 व्या दिवशी खालील निरीक्षण करणे गरजेचे आहे. 

निरीक्षणे

✅वनस्पती शास्त्रानुसार कोणत्याही वनस्पती रोपांची पूर्नलागवड केल्यानंतर सर्वप्रथम वनस्पती रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत वाढ करते व त्यानंतर रोपांना 2 पानांचा नवीन शेंडा येतो. याच्याच आधारावर आपण टोमॅटो रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ कोकोपीट जमिनीत झाली आहे ते पहा तसेच रोपांना वर नवीन दोन पानांचा शेंडा आला आहे का ते पहा.
जर कोकोपीट रोपांच्या मुळांची वाढ झालेली नसेल तर रोपांना अन्नपुरवठा बंद होतो व रोपांची शेंड्याची पाने जांभळी व इतर पाने पिवळी पोपटी पडायला लागतात.अशा प्रकारे जी रोपे सेट झाली आहेत अशा रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ कोकोपीट बाहेर जमिनीत झालेली असते व त्या रोपांना दोन पानांचा शेंडा आलेला असतो.व जी रोपे सेट झालेली नसतात त्यांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत वाढ झालेली नसते व त्यामुळे अशा रोपांना नवीन शेंडा पण येत नाही आणि जी शेंड्याची पाने आहेत ती जांभळ्या रंगाची होतात तसेच पाने पोपटी  किंवा पिवळी पडतात.

उपाययोजना 

✅रोपे लवकर सेट होण्यासाठी लागवडीनंतर  5 दिवसांनी आळवणी करावी.


 

Back to blog