टोमॅटो शेतात पक्षांसाठी थांबे कशा प्रकारे करावेत व का करावेत?

Farmspot Agro

टोमॅटो शेतात पक्षांसाठी थांबे कधी करावेत? 

✅टोमॅटो शेतात पक्षांसाठी थांबे हे टोमॅटो रोपांची फळधारणेची अवस्था सुरू होते तेव्हा करावेत म्हणजेच सर्वसाधारण रोप लागवडीनंतर 35 ते 40 दिवसांनी करावेत. 

टोमॅटो शेतात पक्षांसाठी थांबे कशा प्रकारे करावेत? 

✅टोमॅटो शेतात पक्ष्यांसाठी थांबे करताना जे आपण डांब लावणार आहे त्या डाबांच्या पेक्षा 30 Cm उंच डांब लावावे. त्या डाबांवर आडवा एक डांबांचा 40Cm चा तुकडा बांधावा जेणेकरून पक्षी येऊन त्यावर थांबतील किंवा कडवळ प्रकारातील उंच जाणारी ज्वारी लावावी जिची उंची टोमॅटोच्या उंची पेक्षा जास्त होते व त्यावर ज्वारीचे कणीस असल्यामुळे पक्षी आकर्षित होतात.ही ज्वारी लावताना एका जागी जास्त बी लावावे व थोड्या उंचीवर गेल्यानंतर त्यांना एकत्रित बांधावे,जेणेकरून ते कोलमडणार नाहीत.ही ज्वारी ज्यावेळेस टोमॅटो लावायचे तेव्हा लावली तर टोमॅटो 40 दिवसांचे होईल तेव्हा टोमॅटो पेक्षा सर्वसाधारण 1 ते 2 फूट उंच होईल.ज्याचा वापर पक्षांच्या थांब्यांसाठी होईल.

टोमॅटो पिकात पक्षांसाठी थांबे कशासाठी करावेत? 

✅टोमॅटो पिकात रोप लागवडीनंतर 35 ते 40 दिवसांनी फळधारणा सुरू होते.ज्यावेळेस फळधारणा सुरू होते तेव्हा अळी गटातील किडींचा प्रादुर्भाव सुरू होतो.जर आपण शेतामध्ये पक्षांचे थांबे केले तर शेतामध्ये पक्षी येतात व शेतामध्ये पक्षी आल्यामुळे शेतामध्ये असणाऱ्या अळी गटातील किडींचे ते भक्षण करतात व अळी गटातील किडींवर नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळते.
✅पक्षी हे अळी गटातील किडींचे भक्षण करतात,कोणत्याही रसशोषक किडींचे ते भक्षण करू शकत नाहीत त्यामुळे थांबे हे रोप लागवडीनंतर 35 ते 40 दिवसांनी करावेत. 


 

Back to blog