हंगामानुसार टोमॅटो लागवडीसाठी मल्चिंग पेपर कसा टाकावा?

Farmspot Agro

टोमॅटो लागवडीसाठी मल्चिंग पेपर टाकत असताना हंगामाचा विचार नक्की करावा.

✅ पावसाळी हंगाम

▸ प्रामुख्याने टोमॅटो लागवड ही उन्हाळी, पावसाळी व हिवाळी हंगामात केली जाते.

▸ जर पावसाळी हंगामात टोमॅटो लागवडीसाठी मल्चिंग पेपर टाकत असाल, तर मल्चिंग पेपरच्या दोन्ही बाजूंनी माती टाकू शकता.

✅ उन्हाळी व हिवाळी हंगाम

▸ हिवाळी व उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी मल्चिंग टाकत असाल, तर मल्चिंग टाकताना दोन्ही बाजूंनी पूर्णपणे माती न टाकता त्यावर ढिगढिग माती टाकावी.

▸ कारण उन्हाळ्यामध्ये जर दोन्ही बाजूंवर माती टाकली, तर पेपरच्या आत गरम वाफ तयार होते आणि त्यास बाहेर येण्यासाठी जिथे रोप लावले आहे ती जागा असते. त्यामुळे येणारी वाफ थेट रोपांवर येते, रोपांची खालील पाने जळतात व रोपमर होते.

▸ म्हणून उन्हाळ्यामध्ये मल्चिंगच्या दोन्ही बाजूंनी मातीचे ढीग टाकावेत, पूर्ण मल्चिंगच्या दोन्ही बाजू मुजवू नयेत.

Back to blog