टोमॅटोच्या फळधारणेच्या अवस्थेत रोपांचा विकास कशाप्रकारे होतो?

Farmspot Agro

टोमॅटोच्या फळधारणेच्या अवस्थेत रोपांचा विकास खालील प्रमाणे होतो :

▸ टोमॅटो रोप फळधारणेची अवस्था ही रोप लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी होते.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांची पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट असणे गरजेचे आहे.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांना नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांना नवीन फुलांची निर्मिती होते.
▸ या अवस्थेत फुलांपासून फळधारणा होत असते.


 
Back to blog