टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थेत रोपांचा विकास कशा प्रकारे होतो?
Farmspot AgroShare
टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थेत रोपांचा विकास खालील प्रमाणे होतो:
▸ टोमॅटो रोप वाढीची अवस्था ही रोप लागवडीनंतर 12 दिवस ते रोप लागवडीनंतर 35 दिवसांच्या दरम्यान असते.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर व तंतुमय वाढ होते.
▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांचे खोड हे जाड होते. खोड जाड झाल्यामुळे निघणारे फुटवे व निघणारे शेंडे जाड निघतात, ज्यामुळे फुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते.
▸ या अवस्थेत नवीन फुटवे व नवीन शेंडे निघतात.
▸ या अवस्थेत दोन फांद्यांमधील व पेऱ्यामधील अंतर कमी असणे गरजेचे आहे. जर अंतर वाढले तर फुल अवस्थेत फुलांची संख्या कमी होते.
▸ या अवस्थेत रोपांची पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार व आतून तेलकट होतात.
▸ या अवस्थेत नवीन पानांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते.