टोमॅटो फळ तोडणीच्या अवस्थेत रोपांचा विकास कशाप्रकारे होतो?

Farmspot Agro

टोमॅटो फळ तोडणीच्या अवस्थेत रोपांचा विकास कशाप्रकारे होतो?

▸ टोमॅटो फळ तोडणीच्या अवस्थेत रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ तंतुमय होते. नवीन पांढऱ्या मुळांची निर्मिती होते.

▸ टोमॅटो फळ तोडणीची अवस्था ही रोप लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांनी सुरू होते.

▸ या अवस्थेत नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात.

▸ शेंड्यावर नवीन फुलांची निर्मिती होते.

▸ या अवस्थेत नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट होतात.

▸ या अवस्थेत शेंड्यावर फळधारणा होते.

▸ या अवस्थेत फळांचा आकार वाढतो, फळांची नैसर्गिक गुणवत्ता वाढते.

Back to blog