टोमॅटो फळ फुगवणीच्या अवस्थेत रोपांचा विकास कशा प्रकारे होतो ?

Farmspot Agro

टोमॅटो फळ फुगवणीच्या अवस्थेत रोपांचा विकास खालील प्रमाणे होतो:

▸ टोमॅटो फळ फुगवणीची अवस्था ही रोप लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी सुरू होते.

▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ तंतुमय होते.

▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांची पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट होणे गरजेचे आहे.

▸ या अवस्थेत नवीन शेंडे व नवीन फुटवे निघणे गरजेचे आहे.

▸ या अवस्थेत रोपांच्या शेंड्यावर नवीन फुलांची निर्मिती होते.

▸ या अवस्थेत फुलांपासून फळधारणा होणे सुद्धा गरजेचे आहे.

▸ या अवस्थेत प्रामुख्याने फळांचा आकार व गुणवत्ता वाढते.

Back to blog