टोमॅटो फळ तोडणीची अवस्था
Farmspot AgroShare
✅टोमॅटो फळ तोडणीच्या अवस्थेत रोपांचा विकास कशाप्रकारे होतो?
▸ टोमॅटो फळ तोडणीच्या अवस्थेत रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ तंतुमय होते. नवीन पांढऱ्या मुळांची निर्मिती होते.
▸ टोमॅटो फळ तोडणीचे अवस्था ही रोप लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांनी सुरू होते.
▸ या अवस्थेत नवीन शेंडे व नवीन फुटवे निघतात.
▸ शेंड्यावर नवीन फुलांची निर्मिती होते.
▸ या अवस्थेत नवीन पानांची निर्मिती होते. पाने रुंद, पसरट, जाड, हिरवीगार व आतून तेलकट होतात.
▸ या अवस्थेत शेंड्यावर फळधारणा होते.
▸ या अवस्थेत फळांचा आकार वाढतो, फळांची नैसर्गिक गुणवत्ता वाढते.
✅या अवस्थेत येणारे बुरशीजन्य रोग
▸ स्टेमफायलियम राखाडी ठिपके (Stemphyllium solani)
▸ भुरी (Oidium lycopersici)
▸ टोमॅटो लीफ मोल्ड (Passalora fulva)
▸ रोपमर (Phytophthora)
▸ उशिरा येणारा करपा (Phytophthora infestans)
✅या अवस्थेत येणारे विषाणूजन्य रोग
▸ CMV (Cucumber mosaic virus)
▸ TLCV (Tomato leaf curl virus)
✅या अवस्थेत येणाऱ्या किडी
मावा
मावा हि किड सोंडेच्या साह्याने रसशोषण करतात. अतिप्रमाणात पाने आकसतात व पाने पिवळी पडतात, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया मंदावते व रोपांची वाढ खुंटते.या रसशोषण कीडींच्या प्रादुर्भावमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
तुडतुडे
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पाने आकसतात, पानांवर पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. किंवा पानांवर पिवळसर डाग दिसतात. ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या असंख्य प्रक्रिया मंदावतात,ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते व विकास थांबतो. या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
पांढरी माशी
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानांच्या वाट्या होतात,पाने पिवळी पडतात,पानांवर ठिपके दिसतात.यामुळे रोपांवर जैविक ताण येतो. रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या प्रक्रिया असंतुलित होतात,ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते.
फूल किडे
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानांवर बारीक चंदेरी चट्टे पडतात.ज्यामुळे पाने आकसतात,पाने पिवळी पडतात.यामुळे रोपांची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया, विस्कळीत होते.परिणामी रोपांची वाढ खुंटते व विकास थांबतो.या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.
नागअळी
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांच्या पानांवर नागमोडी आकाराचे पांढऱ्या रंगाचे लहान चट्टे दिसतात.ज्यामुळे पानांमधील हरितकणाचे प्रमाण कमी होते.व प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते.पानांमधील शिरांणा हानी पोहचते.ज्यामुळे वहन प्रक्रिया विस्कळीत होते. एकंदरीत या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.
टुटा नागअळी
या अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव पानांवर व कोवळ्या शेंड्यावर होतो.पानांवर नागअळी पेक्षा मोठ्या आकाराचे पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात. कालांतराने ते करपतात,शेड्यांवर हि किड पोखरते,ज्यामुळे शेड्यांचे नुकसान होते.एकंदरीत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे वहन प्रक्रिया विस्कळीत होते.प्रकाशसंश्लेषण प्रक्रिय,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया विस्कळीत होते.ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो. झालेल्या जखमांमधून बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.रोपांवर जैविक व अजैविक ताण येतो.एकंदरीत टूटा नागअळीमुळे रोपांची वाढ थांबते.
लीफ हॉर्नवॉर्म
हि अळी टोमॅटोच्या कोवळया पानांवर खाणे सुरू करते. ज्यामुळे पानांना जखमा होतात. त्यातून बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.पानांचे नुकसान झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया यावर होतो.ज्याचा एकंदरीत परिणाम हा रोपांच्या वाढीवर व विकासावर होतो.
फळ पोखरणारी अळी
हि किड फळांना पोखरते ज्यामुळे फळांचे नुकसान होते. तसेच हि किड पाने सुद्धा खाते, ज्यामुळे फळांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. पानांचे नुकसान झाल्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया, मंदावते ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोपांवर जैविक ताण येतो.व फुलांची फुलगळ होते.
लाल कोळी
या कीडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पानांवर तपकिरी व पिवळे ठिपके दिसतात.पानांच्या कडा वाकड्या होतात,पानांचा हिरवा रंग कमी होतो पाने पिवळी पडतात. रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया,मंदावते.
तंबाखूवरील सुरवंट
हि किड पानांना खाते व फळ पोखरते ज्यामुळे पिकाचे नुकसान होते. रोपांच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया विस्कळीत होतात,ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते.
हेलीकोव्हर्पा सुरवंट
हि किड पानांवर खाते व फळ पोखरते ज्यामुळे नुकसान होते व रोपांच्या अंतर्गत प्रकाशसंश्लेषण प्रक्रिय,श्वसन प्रक्रिया,वहन प्रक्रिया असंतुलित होते व ज्यामुळे रोपांची वाढ व विकास थांबतो.
टोमॅटो पिकात फळ तोडणीची अवस्था हि रोप लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांनी सुरू होते. (हे कोणत्या व्हारायटीची लागवड केली आहे यावर अवलंबून आहे)
रोपांवर येणारा जैविक व अजैविक ताण येतो
✅या अवस्थेत रोपे फळांचा विकास करत असतात. त्याचबरोबर नवीन फुलांची निर्मिती, नवीन शेंड्यावर फळधारणा चालू असते. या अवस्थेत तापमान, उष्णता, आद्रता यासारख्या वातावरणीय घटकांमुळे अजैविक असा ताण येत असतो. तर किडीवर रोगांच्या प्रादुर्भावामुळे रोपांवर जैविक स्वरूपाचा ताण येत असतो. या जैविक व अजैविक तणाचा थेट विपरीत परिणाम या अवस्थेत होणाऱ्या रोपांच्या वाढीवर व विकासावर होतो.
शेंडा चालू न राहणे
✅या अवस्थेत प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे तयार केलेले अन्न/ ऊर्जा ही फळांचा आकार वाढवण्यासाठी प्रामुख्याने वापरली जाते, ज्यामुळे अन्नद्रव्य नियोजनामध्ये व्यवस्थित नियोजन न करता आल्यामुळे रोपांचा शेंडा चालू राहत नाही. नवीन फुलांची निर्मिती होत नाही.
फुलांची निर्मिती न होणे/फळधारणा न होणे
✅या अवस्थेत प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून तयार केलेले अन्न/ऊर्जा रोपांच्या फळांचा आकार वाढण्यासाठी प्राथमिकतेने वापरले जाते. रोपांना नवीन फुलांची निर्मिती व फळधारणा होत नाही. यावर उपाययोजना म्हणून चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य नियोजन करणे गरजेचे आहे.
पाने पिवळी पडणे व पानांचा आकार लहान होणे
✅या अवस्थेत विविध प्रक्रियांमधून तयार झालेले अन्न हे फळांचा आकार वाढवण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते. ज्यामुळे इतर कार्यासाठी वनस्पतीला ऊर्जा पुरत नाही व अशातच अन्नद्रव्य नियोजन व्यवस्थित झाले नाही तर पाने पिवळी किंवा पोपटी होतात व पानांचा आकार लहान होतो.
मुळांची कार्यक्षमता कमी होणे
✅ही अवस्था रोप लागवडीनंतर 45 दिवसांनी सुरू होते, या अवस्थेत बरेच शेतकरी फळांचा आकार वाढवण्यावर लक्ष देतात. परंतु मुळांच्या विकासाच्या दृष्टीने उपाययोजना करत नाहीत, त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या टोमॅटो प्लॉटमध्ये मुळांची कार्यक्षमता कमी होणे या अडचणी खूप मोठ्या प्रमाणावर येतात.
तापमानामुळे पानांच्या वाट्या होणे
✅या अवस्थेत तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यानंतर रोपांच्या पानांद्वारे बाष्पोउत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते व पानांच्या वाट्या होतात. ज्याचा थेट परिणाम या अवस्थेतील रोपांच्या विकासावर होतो.
फळांचा आकार वाढणे
✅या अवस्थेत पाने, पिवळी पडणे, पानांचा आकार लहान होणे, पानांच्या वाट्या होणे, मुळांची कार्यक्षमता कमी होणे, यांसारख्या अडचणींमुळे रोपांना अन्नद्रव्य कमतरता निर्माण होते, रोपांच्या अंतर्गत प्रकाश संश्लेषण, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या प्रक्रिया संथ गतीने कार्य करतात. व या सर्वांचा थेट परिणाम फळांचा आकार वाढण्यावर होतो.
अन्नद्रव्ये कमतरता
✅या अवस्थेत नवीन पानांची निर्मिती, नवीन फुलांची निर्मिती, फळधारणा व फळांचा आकार वाढण्यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बोरॉन, झिंक, केरस यांसारख्या अन्नद्रव्यांची गरज असते. त्यांचा पुरवठा संतुलित प्रमाणात झाला नाही तर त्यांचा थेट परिणाम रोपांच्या वाढीवर व विकासावर होतो.
कॅल्शियम कमतरता लक्षणे दिसणे
✅या अवस्थेत कॅल्शियम अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळांवर त्यांची लक्षणे दिसतात, व फळ कुज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
लहान फळे लाल होणे
✅टोमॅटो तोडणी ज्यावेळेस चालू होते, त्यावेळेस संपर्ण लाल झालेले फळ जर का रोपांवर राहिले, तर त्यांच्या शेजारच्या बंच मधील किंवा त्याच फळाच्या बंच मधील फळे लाल होतात.
फळांना नेसर्गिक रंग व चकाकी येत नाही
✅या अवस्थेत फळांना नेसर्गिक लाल रंग येण्यासाठी सल्फर, झिंक,पोटॅश,मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांची गरज असते, परंतु या अन्नद्रव्यांची पूर्तता योग्य प्रमाणात झाली नाही तर फळांना चकाकी व लाल रंग येत नाही.