टोमॅटो वाढीसाठी पोषक वातावरण
Farmspot AgroShare
टोमॅटो उत्तम वाढीसाठी योग्य वातावरण महत्वाचे आहे. योग्य तापमान, आद्रता, प्रकाश आणि मातीची गुणवत्ता हे घटक टोमॅटोच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक आहेत.
✅ तापमान
▸ 20°C ते 39°C च्या दरम्यानचे तापमान टोमॅटोच्या वाढीसाठी पोषक असते.
▸ 10°C पेक्षा कमी तापमान टोमॅटोच्या वाढीसाठी नुकसानकारक ठरते.
▸ 35°C पेक्षा जास्त तापमान रोपांच्या अंतर्गत प्रक्रिया असंतुलित होतात व वाढ खुंटणे, फुलगळ होणे, फळधारणा न होणे यांसारख्या अडचणी येतात.
✅ आद्रता
▸ 50% ते 70% आद्रता ही टोमॅटोच्या रोपांच्या वाढीसाठी व विकासासाठी आदर्श आद्रता असते.
▸ 70% पेक्षा आद्रता जास्त असल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
▸ कमी आद्रतेमुळे पाने कोरडी होतात आणि याचा रोपांच्या वाढीवर व विकासावर परिणाम होतो.
✅ सूर्यप्रकाश
▸ टोमॅटोच्या वाढीसाठी व विकासासाठी दिवसाचे 8 ते 9 तास सूर्यप्रकाश आवश्यक आहे.
▸ हिवाळी हंगामात दिवस लहान व रात्र मोठी असल्यामुळे रोपांची वाढ कमी होते.
▸ उन्हाळी व पावसाळी हंगामात दिवस मोठा व रात्र लहान असल्यामुळे रोपांची वाढ चांगली होते.
▸ प्रकाश संश्लेषणासाठी सूर्यप्रकाशाचे प्रमाण व गुणवत्ता महत्त्वाची आहे.
✅ हवा
▸ शेतामध्ये हवा खेळती नसल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो व रोपांच्या प्रक्रिया मंदावतात.
▸ हवा खेळती असल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो व रोपांची वाढ चांगली होते.
▸ हवा खेळती राहण्यासाठी दोन रोपांमधील आणि दोन ओळींमधील अंतर योग्य ठेवावे.