हंगामनुसार एकरी टोमॅटो रोपांची संख्या किती असावी?
Farmspot AgroShare
✅हिवाळा व उन्हाळा हंगाम
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 4.5 फुट व दोन रोपांमधील अंतर 1.5 फुट असेल तर एकरात सर्वसाधारण 7500 ते 7700 रोपे बसतील.
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 5 फुट व दोन रोपांमधील अंतर 1.25 फुट असेल तर एकरात सर्वसाधारण 6800 ते 6900 रोपे बसतील.
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 5 फुट व दोन रोपांमधील अंतर 1.5 फुट असेल तर एकरात सर्वसाधारण 5600 ते 5800 रोपे बसतील.
✅हिवाळा व उन्हाळा हंगाम
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 6 फुट व दोन रोपांमधील अंतर 1.25 फुट असेल तर एकरात सर्वसाधारण 5600 ते 5800 रोपे बसतील.
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 6 फुट व दोन रोपांमधील अंतर 1.5 फुट असेल तर एकरात सर्वसाधारण 4800 ते 5000 रोपे बसतील.
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 5.5 फुट व दोन रोपांमधील अंतर 1.25 फुट असेल तर एकरात सर्वसाधारण 6300 ते 6500 रोपे बसतील.
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 5.5 फुट व दोन रोपांमधील अंतर 1.5 फुट असेल तर एकरात सर्वसाधारण 5000 ते 5200 रोपे बसतील.
✅जर ट्रॅक्टर पद्धतीने फवारणी करत असाल तर …
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 8 फुट असेल व एका गादीवाफ्यावर झिगझॅक पद्धतीने दोन ओळी व दोन रोपांमधील अंतर 1.5 फुट असेल तर एकरात सर्वसाधारण 7260 रोपे बसतील.
▸ जर दोन ओळींमधील अंतर हे 8 फुट असेल व एका गादीवाफ्यावर झिगझॅक पद्धतीने दोन ओळी व दोन रोपांमधील अंतर 2 फुट असेल तर एकरात सर्वसाधारण 5400 ते 5500 एवढी रोपे बसतील.