टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थेत 25 दिवसांनी टोमॅटो रोपांच्या बुडातील तणे का काढुन घ्यावीत व त्यानंतर कोणती फवारणी आणि ती का करावी?

Farmspot Agro

▸ टोमॅटो रोपांची लागवड केल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी शेतामध्ये तणांचे बी अंकुरते व शेतामध्ये दिसते. जे दोन्ही ओळींमधील पाटात जे तण असते त्यासाठी आपण तणनाशकाची फवारणी करतो, परंतु मल्चिंगवर ज्या होलात आपण रोपांची लागवड केली आहे त्या होलात सुद्धा तण आलेले असते त्या तणांवर आपण तणनाशक फवारणी करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण टोमॅटो रोपांची बांधणी करण्याअगोदर रोपांच्या  बुडातील तण काढून घ्यावे. बुडातील तण काढल्याचे भरपूर फायदे आहेत.

▸ बुडातील तण काढल्यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होत नाही. या तणांवर सुद्धा रसशोषण करतात तसेच जेव्हा आपण किटकनाशक फवारणी करतो तेव्हा त्या किडी तणांच्या आतमध्ये लपतात. हे होऊ नये म्हणून बुडतील तण काढून घ्या. 

▸ बुडातील तण काढल्यामुळे मुख्य पिकाशी असणारी तणांची स्पर्धा कमी होते. ज्यामुळे रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते. दिलेले अन्नद्रव्ये रोपांना एकसारखे मिळते.

▸ बुडातील तण काढल्यामुळे टोमॅटो रोपांच्या बुडाजवळील माती हलते मातीतील भुसभुशीतपणा वाढतो, ज्यामुळे मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते, तसेच जिवाणूंची कार्यक्षमता सुद्धा चांगल्या प्रकारे वाढते. ज्यामुळे रोपांची वाढ व शाखीय विकास चांगल्या प्रकारे होतो.

▸ जेव्हा तुम्ही टोमॅटो रोपांच्या बुडातील तण काढताना जी रोपांच्या पानांवर माती उडते त्यामुळे सेप्टोरिया काळे ठिपके व लवकर येणारा करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.

अशा प्रकारे आपण रोप लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी रोपांच्या बुडातील तण काढून घेऊन फवारणी करावी.

Back to blog