टोमॅटो रोप रुझण्याच्या अवस्थेत करायचे पाणी नियोजन
Farmspot AgroShare
▸ टोमॅटो रोप रुजण्याची अवस्था ही रोप लागवड ते पहिले 12 दिवस असते.
▸ टोमॅटो रोपांच्या वाढीसाठी व विकासासाठी रोपांचे पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.
▸ टोमॅटो पिकामध्ये पाण्याचे नियोजन करत असताना हंगाम, वातावरणीय परिस्थिती, जमिनीचा प्रकार लक्षात घेणे गरजेचे आहे.
मातीच्या प्रकारानुसार पाणी नियोजन
✅काळी माती (जाड माती)
▸ या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. अशा जमिनीत रोप रुजण्याच्या अवस्थेत टोमॅटो लागवड केल्यानंतर 10 ते 15 मिनिटे पाणी द्यावे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 10 ते 15 मिनिटे पाणी द्यावे. त्यानंतर रोप लागवडीनंतर 5 व्या दिवशी 10 ते 15 मिनिटे पाणी द्यावे. त्यानंतर रोप लागवडीनंतर 7 व्या दिवशी 10 ते 15 मिनिटे पाणी द्यावे. त्यानंतर रोप लागवडीनंतर 12 व्या दिवशी 15 ते 20 मिनिटे पाणी द्यावे.
▸ अशा प्रकारे काळवट जमिनीत किंवा चांगले पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या जमिनीत ठिबकद्वारे पाणी नियोजन करावे.
✅तांबट माती (मध्यम माती)
▸ या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम असते. अशा जमिनीत रोप रुजण्याच्या अवस्थेत टोमॅटो लागवड केल्यानंतर 15 ते 20 मिनिटे पाणी द्यावे. त्यानंतर रोप लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी 15 ते 20 मिनिटे पाणी द्यावे. त्यानंतर रोप लागवडीनंतर 5 व्या दिवशी 15 ते 20 मिनिटे पाणी द्यावे. त्यानंतर रोप लागवडीनंतर 7 व्या दिवशी 15 ते 20 मिनिटे पाणी द्यावे. त्यानंतर रोप लागवडीनंतर 10 व्या दिवशी 20 ते 25 मिनिटे पाणी द्यावे. त्यानंतर रोप लागवडीनंतर 12 व्या दिवशी 15 ते 20 मिनिटे पाणी द्यावे.
▸ अशा प्रकारे तांबट माती (मध्यम माती) जमिनीत ठिबकद्वारे पाणी नियोजन करावे.
✅मुरमाड किंवा वाळूजार माती (हलकी माती)
▸ या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा जमिनीत रोप रुजण्याच्या अवस्थेत टोमॅटो लागवड केल्यानंतर 20 ते 25 मिनिटे पाणी द्यावे व अशा जमिनीत पहिले 7 दिवस दररोज 20 ते 25 मिनिटे पाणी द्यावे. त्यानंतर 7 ते 12 दिवस दररोज 25 ते 30 मिनिटे पाणी द्यावे.
▸ अशा प्रकारे मुरमाड व वाळूजार (हलक्या) जमिनीत ठिबकद्वारे पाणी नियोजन करावे.