टोमॅटो पिकात पोटॅश या अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे काय आहेत आणि त्यामुळे काय नुकसान होते?

Farmspot Agro

✅ लक्षणे

▸ पोटॅशियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे रोपांच्या पानांच्या वाट्या होतात आणि त्यावर तांबूस तपकिरी रंगाची जळलेली लक्षणे दिसतात.
▸ पानांचा मध्यभाग गडद हिरवा राहतो पण पानांचे कडे पिवळे दिसतात.
▸ झाडांची वाढ मंदावते आणि खोड पातळ व कमकुवत होते.
▸ रोपांची फळे लहान, कठीण आणि कमी रसाळ होतात.
▸ फळांवर काळे डाग दिसतात.
▸ रोपांची फुले आणि फळे गळून पडतात.

✅ कारणे

▸ मातीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण कमी असणे.
▸ अत्याधिक आम्लीय मातीमध्ये पोटॅशियमची उपलब्धता कमी होते.
▸ जास्त पावसामुळे मातीतील पोटॅशियम शेताबाहेर वाहून जाते.
▸ रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर न केल्यामुळे पोटॅशियमची कमतरता होऊ शकते.
▸ मातीचे खराब आरोग्य आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने पोटॅशियमची उपलब्धता कमी होऊ शकते.

✅ नुकसान

▸ पोटॅशियमच्या कमतरतेमुळे पानांच्या पर्णरंद्रांची उघडझाप असंतुलित होते, ज्यामुळे पानांच्या मधून पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पानांच्या वाट्या होतात आणि वाढ खुंटते.
▸ पोटॅशियमच्या कमतरतेमुळे रोपांमध्ये प्रोटीन संश्लेषण प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे अन्नद्रव्य पुरवठ्यावर परिणाम होतो आणि वाढ मंदावते.
▸ पोटॅशच्या कमतरतेमुळे रोपांची रोग प्रतिकारशक्ती कमी होते व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
▸ पोटॅशच्या कमतरतेमुळे फळांचा आकार व गुणवत्ता कमी होते (रंग आणि गोडवा कमी होतो).

✅ उपाययोजना

▸ माती परीक्षण करून त्यानुसार पोटॅशियमचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा.
▸ MOP (म्यूरेट ऑफ पोटॅश) किंवा SOP (सल्फेट ऑफ पोटॅश) यांसारखी पोटॅशियुक्त खते वापरावीत.
▸ शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर करून मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता व पोषण क्षमता वाढवावी.
▸ मातीचे pH संतुलित ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात चुनखडी वापरावी.
▸ मातीतील आर्द्रता टिकवण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करावा, ज्यामुळे पोटॅशियमची धूप कमी होईल.
▸ पिकांचे नियमित निरीक्षण करून लक्षणे दिसताच त्वरित उपाययोजना करावी.

या उपाययोजनांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास टोमॅटो पिकात पोटॅशियमच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान कमी करता येईल आणि उत्पादन वाढवता येईल.

Back to blog