रोप रुजण्याची अवस्था पूर्ण झाल्यानंतर या अवस्थेत रोपांची वाढ कशाप्रकारे झाली आहे याचे निरीक्षण कशा प्रकारे करावे. 

Farmspot Agro

रोप रुजण्याची अवस्था ही रोपांची पूर्नलागवड ते पहिले 15 दिवस असते, त्या अवस्थेत रोपांची वाढ तपासताना खलील मुद्द्याच्या आधारे तपासवेत. 

रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ

▸ कोणतीही वनस्पती रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीमध्ये वाढ करत असते. रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्याप्रकारे झाली असेल तर रोपांच्या मुळांद्वारे चांगल्याप्रकारे अन्नद्रव्ये शोषण केले जाते व रोपांची वाढ व विकास चांगल्याप्रकारे होतो.

रोपांची उंची 

▸ रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांची उंची किती झाली आहे हे तपासवे. 

फुटव्यांची संख्या

▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांना किती फुटवे आहेत हे तपासावे. (या अवस्थेत जेवढी फूटव्यांची संख्या जास्त तेवढा वाढीच्या अवस्थेत रोपांचा विकास चांगल्याप्रकारे होतो.)

खोडाची जाडी

▸ या अवस्थेत टोमॅटो रोपांच्या खोडाची जाडी तपासावी. (या अवस्थेत जेवढी खोडाची जाडी जास्त असते. तेवढी रोप वाढीच्या अवस्थेत फूटव्यांची संख्या जास्त तेवढा वाढीच्या अवस्थेत रोपांचा विकास चांगल्याप्रकारे होतो.)

पानांचा आकार आणि रंग

▸ या अवस्थेत टोमॅटो पानांचा आकार किती आहे आणि पानाचा रंग हे तपासावे. (जेवढा पानांचा रंग गडद हिरवा असतो आणि पानांचा आकार हा जेवढा पसरट असतो तेवढा जास्त सूर्यप्रकाश शोषला जातो. ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया जलद गतीने होते.) ज्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो. 


 

Back to blog