कांदा वाढीच्या अवस्था कोणत्या आहेत ?
Farmspot AgroShare
कांदा रोप वाढीच्या अवस्था किती दिवसांच्या असतात हे वातावरण, व्हरायटी , मातीचा प्रकार व नियोजन यावर अवलंबून आहे. कांदा पुर्नलागवडीनंतर कांदा वाढीच्या अवस्था कोणत्या आहेत, या अवस्थेमध्ये कांद्याचा विकास कशाप्रकारे होतो याची माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
कांदा रोप रुजण्याची अवस्था
✅कांदा रोप रुजण्याची अवस्था ही रोग पुर्नलागवड ते पहिले 30 दिवस असते, या अवस्थेत कांद्याच्या मुळांची तंतुमय वाढ जमिनीत होते व रोपे सेट होण्यास सुरुवात होते. त्यानंतर रोपांना नवीन 2 ते 3 पाती येतात.
कांदा रोप वाढीची अवस्था
✅कांदा रोप वाढीची अवस्था ही रोप लागवडीनंतर 20 दिवस ते 50 दिवसांपर्यंत असते. या अवस्थेत रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते, तसेच रोपांना नवीन 4 ते 7 पाती येतात.तसेच कांद्याची मान जाड होण्यास सुरुवात होते.
कंद निर्मितीची अवस्था
✅कांदा रोप कंद निर्मितीची अवस्था ही कांदा रोप लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी सुरू होते व 70 ते 75 दिवसांपर्यंत सुरू असते. या अवस्थेत पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते, तसेच रोपांना नवीन 8 ते 12 पाती येतात, तसेच या अवस्थेत रोपांची उंची जास्तीत जास्त वाढते. रोपांची मान जाड होते व प्रमुख कार्य म्हणजे रोपांद्वारे कंद निर्मितीस सुरुवात होते.
कंद फुगवणीची अवस्था
✅कांदा पिकात कंद फुगवणीची अवस्था ही रोप लागवडीनंतर 70 ते 75 दिवसांनी सुरू होते.या अवस्थेत नवीन पातींची निर्मिती होत नाही तसेच पातीची उंची सुद्धा वाढत नाही, परंतु पातींचा आकार या अवस्थेत वाढतो.तसेच प्रमुख काम या अवस्थेत होते ते म्हणजे कांद्याचा आकार व वजन वाढते.
कांदा काढणीची अवस्था
✅कांदा पिकात कंद काढणीची अवस्था ही 120 ते 140 दिवसांनी सुरू होते या अवस्थेत पातीची वाढ व विकास संपूर्णपणे थांबतो. तसेच जुन्या पाती खालून पिवळ्या पडतात व काही कांदे माने पासून पडतात. त्यानंतर या अवस्थेत कांदा काढणी केली जाते.