कांदा पुर्नलागवडीचे प्रकार

Farmspot Agro
कांदा पुर्नलागवडीचे विविध प्रकार आहेत ते खालील प्रमाणे

✅ सारा वाफा पद्धत 
✅ गादी वाफा पद्धत
✅ सरी पद्धत

सारा पद्धत 

✅ यामध्ये मशागत केल्यानंतर 6 फूटी सारे सोडून त्यामध्ये कांदा लागवड केली जाते. ही पद्धत फार जुनी व पारंपारिक कांदा लागवड पद्धत आहे.यामध्ये आपण पाणी नियोजन हे सोडपाणी म्हणजेच पाटपाणी पद्धतीद्वारे तुषार सिंचन पद्धतीद्वारे किंवा रेन पाईपद्वारे देऊ शकतो. सारा वाफा पद्धत ही सपाट एकसारखी जमीन असणाऱ्या शेतासाठी चांगली आहे यामध्ये आपण योग्य प्रकारे पाणी नियोजन करू शकतो.

गादी वाफा पद्धत  

✅ यामध्ये मशागत केल्यानंतर शेताचे 4.5 फुटी गादीवाफे सोडावेत.व त्यावर कांदा रोपांची लागवड केली जाते. ही पद्धत आधुनिक पद्धत आहे. यामध्ये आपण पाणी नियोजन हे ठिबक सिंचन पद्धत, तुषार सिंचन पद्धत व रेन पाईपद्वारे करू शकतो. गादी वाफा पद्धत ही शेत जमिनीत चढ उतार जास्त आहेत अशा जमिनीसाठी योग्य आहे.  यामध्ये आपण योग्य पाणी नियोजन व खत नियोजन केल्यास चांगल्या प्रकारे उत्पादन आपण घेऊ शकतो.

सरी पद्धत 

✅ यामध्ये मशागत केल्यानंतर शेतामध्ये 3.5 फुटी सरी सोडावी. व त्यामध्ये पाटामध्ये दोन्ही बाजूनी कांदा रोपांची लागवड केली जाते ही पद्धत पूर्वीपासून अवलंबली जाते. या पद्धतीमध्ये आपण पाणी नियोजन हे सोडपाणी म्हणजेच पाटपाणी पद्धत याद्वारे करू शकतो. सरी पद्धत ही आंतरपीक पद्धतीसाठी योग्य व आंतरपीक पद्धतीमध्ये जास्त उत्पादन देणारी पद्धत आहे.


अशा प्रकारे आपण जलसिंचन पद्धत जमिनीची चढ-उतार यावरून लागवड पद्धतीची निवड करावी. 

Back to blog