कांदा रोप वाढीची अवस्था
Farmspot AgroShare
रोप वाढीची अवस्था ही रोप लागवडीनंतर सुरू होते व रोप पुर्नलागवडीनंतर 20 दिवसांनी व रोप लागवडीनंतर 50 दिवसांपर्यंत असते.
रोपांची वाढ
रोपांच्या वाढीच्या अवस्थेत पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.तसेच रोपांना नवीन 4 ते 7 पाती येतात.तसेच कांद्याची मान जाड होण्यास सुरुवात होते.
येणारे बुरशीजन्य रोग
रोपवाढीच्या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात.
✅पिथियम रोपमर
✅पिळ रोग
✅बोटट्रीस करपा
✅डाऊनी
✅स्टेमफायलियम करपा
✅भुरी
✅फुजारियम रोपमर
✅जांभळा करपा
येणाऱ्या किडी
रोप वाढीच्या अवस्थेत खालील किडी येतात.
✅मावा
✅तुडतुडे
✅पांढरी माशी
✅लाल कोळी
✅नाग अळी
रोप वाढीच्या अवस्थेत कोणती काळजी घ्यावी?
✅रोप वाढीच्या अवस्थेत नवीन पाती निघतात.निघणाऱ्या नवीन पाती पिवळसर निघत आहेत का ते पहावे.
✅या अवस्थेत योग्य प्रकारे पाणी नियोजन करावे जेणेकरून रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात जास्त ओलावा राहणार नाही व रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.
✅या अवस्थेत अन्नद्रव्य कमतरता जाणवत आहेत का ते पाहावे.
✅या अवस्थेत रोपांची पात वाढत आहे का ते पाहावे.