कांदा रोप रुजण्याची अवस्था 

Farmspot Agro

✅ही अवस्था पुर्नलागवडीनंतर पहिले 15 दिवस असते.
✅रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांची वाढ कशाप्रकारे होते, तसेच या अवस्थेत कोणत्या किडी येतात कोणते बुरशीजन्य रोग येतात.तसेच याअवस्थेत कोणती विशेष काळजी घ्यावी या विषयी खाली माहिती दिलेली आहे. 

रोपांची वाढ 

✅रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांच्या पांढऱ्या मुळांची तंतुमय वाढ होते.रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांना 2 ते 4 नवीन पाती येतात व रोपे सेट होतात.अशा प्रकारची वाढ रोप रुजण्याच्या अवस्थेत कांदा पिकामध्ये होते. 

येणारे बुरशीजन्य रोग 
पीथियम रोपमर 
पिळ रोग 
बोटट्रीस करपा 
येणाऱ्या किडी 
मावा 
तुडतुडे 
काळजी कोणती घ्यावी?
✅या अवस्थेत रोपे सेट झाल्यानंतर नवीन निघणाऱ्या पाती पिवळसर निघत आहेत का ते पाहावे.
✅या अवस्थेत योग्य प्रकारे पाणी नियोजन करावे जेणेकरून रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात जास्त ओलावा राहणार नाही व रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.
Back to blog