कांदा काढणीची अवस्था
Farmspot AgroShare
✅कंद काढण्याची अवस्था ही 120 ते 140 दिवसांनी सुरू होते.या अवस्थेत पातीची वाढ व विकास संपूर्णपणे थांबतो. तसेच जुन्या पाती खालून पिवळ्या पडतात व काही कांदे मानेपासून पडतात. त्यानंतर या अवस्थेत कांदा काढणी केली जाते.
बुरशीजन्य रोग
रोप वाढीच्या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात.
✅बोटट्रीस करपा
✅डाऊनी
✅स्टेमफायलियम करपा
✅भुरी
✅कांदा पांढरी मळकुज
✅जांभळा करपा
येणाऱ्या किडी
रोप वाढीच्या अवस्थेत खालील किडी येतात.
✅मावा
✅तुडतुडे
✅पांढरी माशी
✅तंबाखूवरील सुरवंट
✅लाल कोळी
✅नाग अळी
✅काळी कुरतडणारी अळी
काळजी कोणती घ्यावी?
✅या अवस्थेत योग्य प्रकारे पाणी नियोजन करावे जेणेकरून रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात जास्त ओलावा राहणार नाही व रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.