नायट्रोजन कमतरता
Farmspot AgroShare
नायट्रोजनची कमतरता कशी ओळखावी?
✅नायट्रोजनची कमतरता असेल तेव्हा रोपांची वाढ खुंटते, तसेच नवीन पाती या पिवळसर पोपटी रंगाच्या होतात, पातींचे शेंडे पिवळसर पडायला सुरुवात होते व तसेच संपूर्ण पात पिवळसर पडते, नवीन पाती एकदम पातळ, पिवळसर व पोपटी रंगाच्या निघतात. कांदा कंद निर्मिती लवकर होत नाही. अशा प्रकारची लक्षणे जर तुमच्या प्लॉटमध्ये दिसली तर प्लॉटमध्ये नायट्रोजन कमतरता आहे असे समजावे.
नायट्रोजनची कार्य
कांद्याच्या वाढीमध्ये आणि विकासामध्ये नायट्रोजन महत्वाची भूमिका बजावते.
✅ रोपांची वाढ
नायट्रोजन हा हरितकणांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. ज्यामुळे पाती हिरव्यागार होतात व प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया वाढते परिणामी रोपांची वाढ होते.
✅ कांद्यांचा आकार वाढतो
नायट्रोजन हे पेशी विभाजनाचे कार्य करते, ज्यामुळे कांद्याचा आकार वाढण्यास मदत होते.
✅ प्रथिने संश्लेषण वाढते
नायट्रोजन हा अमिनो ऍसिडचा महत्त्वाचा घटक आहे. तसेच अमिनो ऍसिडमुळे प्रथिने संश्लेषण वाढते व रोपांची वाढ व विकास मोठ्या प्रमाणावर होतो.
✅ मुळांची खोलवर वाढ होते
नायट्रोजनचा वापर केल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची खोलवर वाढ होते व त्यामुळे अन्नद्रव्ये शोषण वाढते.
✅पातीचे जीवनमान वाढवते
नायट्रोजनचा वापर केल्यामुळे पाती हिरव्यागार राहतात, लवकर वृद्ध होत नाहीत व त्यामुळे प्रकाशसंश्लेषणासाठी जास्त कालावधी मिळतो व रोपांची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होतो.
नायट्रोजन कमतरतेची कारणे
ज्या जमिनीत कांदा लागवड करणारा आहात अशा जमिनीत जर नायट्रोजनची कमतरता असेल तर लागवड केल्यानंतर कांदा पिकात नायट्रोजन कमतरतेची लक्षणे दिसतात.
✅ जमिनीचा सामू
ज्या जमिनीचा सामू 6 पेक्षा कमी आहे व 8 पेक्षा जास्त आहे, अशा जमिनीत नायट्रोजन शोषण मुळांद्वारे होत नाही व कांदा पिकामध्ये नायट्रोजन कमतरतेची लक्षणे दिसतात.
✅ अयोग्य पाणी नियोजन
जर पाणी जास्त दिले तर नायट्रोजन रोपांच्या मुळांच्या कक्षेतून बाहेर वाहून जातो. तसेच जास्त ओलावा असल्यामुळे मुळांची शोषण क्षमता कमी होते, ज्यामुळे नायट्रोजन कमतरतेची लक्षणे दिसतात. तसेच जर कमी पाणी दिले तर हवा तेवढा ओलावा मुळांच्या कार्यक्षेत्रात राहत नाही व मुळांची कार्यक्षमता कमी होते व नायट्रोजन कमतरतेची लक्षणे दिसू लागतात.
✅ अति पावसाचे प्रमाण
ज्या वेळेस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तेव्हा जमिनीतून शेताच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये वाहून जातात व मुळांच्या कक्षेत अन्नद्रव्य कमतरता भासते. त्यामुळे नायट्रोजन कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
✅ मातीचा घट्टपणा
ज्या जमिनीचा घट्टपणा कमी असतो तेव्हा अशा जमिनीत मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते व ज्या जमिनीचा घट्टपणा जास्त असतो, तेव्हा मुळांची वाढ कमी होते ज्याचा थेट परिणाम अन्नद्रव्ये शोषणावर होतो व नायट्रोजन कमतरतेची लक्षणे दिसतात.
✅ जास्त क्षारांचे प्रमाण
ज्या जमिनी क्षारांचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीत मुळांची अन्नद्रव्ये शोषण क्षमता कमी होते व नायट्रोजन कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
✅ जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असणे
ज्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असते, तेव्हा फॅटम एक्सचेंज प्रक्रिया संथगतीने होते,ज्यामुळे नायट्रोजन कमतरतेची लक्षणे दिसून येतात.
एकात्मिक उपाययोजना
✅ जमिनीची निवड
नायट्रोजन कमतरता ही हलक्या म्हणजे कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या (लांबट, मुरमाड, वाळूसार) जमिनीत जाणवते, त्यामुळे जमिनीची निवड करताना अशा जमिनीची निवड करू नये. तसेच ज्या जमिनी आम्लयुक्त आहेत अशा जमिनीत नायट्रोजन शोषण कमी होते त्यामुळे अशा जमिनीची निवड लागवडीसाठी करू नये. तसेच क्षारयुक्त जमिनीत अन्नद्रव्ये शोषण कमी असते. त्यामुळे अशा जमिनीची निवड सुद्धा निवड करू नये.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
✅ योग्य खत नियोजन
जमिनीची निवड केल्यानंतर त्या जमिनीची गुणवत्ता व पिकाची गरज या गोष्टींचा अभ्यास करून योग्य खत नियोजन करावे.
✅ योग्य पाणी नियोजन
मातीचा प्रकार, गुणवत्ता व वातावरण यांचा अभ्यास करून योग्य प्रकारे पाणी नियोजन करा. जर योग्य प्रकारे पाणी नियोजन केले तर रान जास्तीत जास्त काळ वाफस्यावर राहते व अन्नद्रव्ये शोषण वाढते आणि नायट्रोजन कमतरता भासत नाही.