कंद निर्मितीची अवस्था 

Farmspot Agro


✅कांदा कंद निर्मितीची अवस्था हि कांदा रोप लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी सुरू होते व ती 70 ते 75 दिवसांपर्यंत सुरू असते.
✅कांदा कंद निर्मितीच्या अवस्थेत पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते. तसेच रोपांना नवीन 8 ते 12 पाती येतात. तसेच या अवस्थेत रोपांची उंची जास्तीत जास्त वाढते. रोपांची मान जाड होते व प्रमुख कार्य म्हणजे रोपांद्वारे कंद निर्मितीची सुरुवात होते. 

येणारे बुरशीजन्य रोग 

कंद निर्मितीच्या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात.
✅पिथियम रोपमर
✅पिळ रोग
✅बोटट्रीस करपा
✅डाऊनी
✅स्टेमफायलियम करपा
✅भुरी
✅फुजारियम रोपमर
✅जांभळा करपा

येणाऱ्या किडी  

कंद निर्मितीच्या अवस्थेत खालील किडी येतात.
✅मावा 
✅तुडतुडे
✅पांढरी माशी
✅लाल कोळी
✅नाग अळी

कंद निर्मितीच्या अवस्थेत कोणती काळजी घ्यावी?

✅कंद निर्मितीच्या अवस्थेत नवीन पाती  निघतात.निघणाऱ्या नवीन पाती पिवळसर निघत आहेत का ते पहावे.
✅या अवस्थेत योग्य प्रकारे पाणी नियोजन करावे जेणेकरून रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात जास्त ओलावा राहणार नाही व रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.
✅
या अवस्थेत अन्नद्रव्य कमतरता जाणवत आहेत का ते पाहावे.
✅
या अवस्थेत रोपांची पात वाढत आहे का ते पाहावे.   

Back to blog