कंद फुगवणीची अवस्था
Farmspot AgroShare
✅कांदा पिकात कंद फुगवणीची अवस्था हि रोपे लागवडीनंतर 70 ते 75 दिवसांनी सुरू होते.
✅कांदा पिकात कंद फुगवणीच्या अवस्थेत नवीन पतींची निर्मिती होत नाही. तसेच पतींची उंची सुद्धा वाढत नाही, परंतु पतींची आकार या अवस्थेत वाढतो. तसेच या अवस्थेत प्रमुख कार्य होते ते म्हणजे कांद्याचा आकार व वजन वाढतो.
✅कंद फुगवणीच्या अवस्थेत कंदाची वाढ कशाप्रकारे होते तसेच या अवस्थेत कोणते बुरशीजन्य रोग येतात, तसेच या अवस्थेत कोणत्या किडी येतात,या अवस्थेत कोणती विशेष काळजी घ्यावी याविषयी खाली माहिती दिलेली आहे.
बुरशीजन्य रोग
रोप वाढीच्या अवस्थेत खालील बुरशीजन्य रोग येतात.
✅बोटट्रीस करपा
✅डाऊनी
✅स्टेमफायलियम करपा
✅भुरी
✅कांदा पांढरी मळकुज
✅जांभळा करपा
येणाऱ्या किडी
रोप वाढीच्या अवस्थेत खालील किडी येतात.
✅मावा
✅तुडतुडे
✅पांढरी माशी
✅तंबाखूवरील सुरवंट
✅लाल कोळी
✅नाग अळी
✅काळी कुरतडणारी अळी
काळजी कोणती घ्यावी?
✅या अवस्थेत कांदा कंदाची वाढ होत आहे का ते ते पहावे.
✅या अवस्थेत योग्य प्रकारे पाणी नियोजन करावे जेणेकरून रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात जास्त ओलावा राहणार नाही व रोपांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.
✅या अवस्थेत अन्नद्रव्य कमतरता जाणवत आहेत का ते पाहावे.
✅या अवस्थेत रोपांची पात वाढत आहे का ते पाहावे.