कांदा रोप लागवडीनंतर 35 दिवसांनी करायचे खत नियोजन
Farmspot AgroShare
✅कांदा रोपांच्या वाढीसाठी खालील प्रमाणात मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते.
- नायट्रोजन - 56 kg - 68 kg प्रति एकर
- फॉस्फरस - 24 kg ते 28 kg प्रति एकर
- पोटॅश - 32 kg ते 40 kg प्रति एकर
- कॅल्शियम - 12 kg ते 20 kg प्रति एकर
- मॅग्नेशियम - 4 kg ते 6 kg प्रति एकर
- सल्फर - 10 kg ते 12 kg प्रति एकर
- झिंक - 1 ते 2.2 kg प्रति एकर
- फेरस - 1.6 ते 2.5 kg प्रति एकर
- बोरॉन - 0.5 kg ते 1 kg प्रति एकर
✅कांदा रोप लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी वरील अन्नद्रव्यापैकी 30% अन्नद्रव्ये खतांद्वारे जमिनीतून द्यावीत, त्यासाठी लागवडीनंतर 30 दिवसांनी खालील खत नियोजन करावे.
- 10:26:26 - 50 kg प्रति एकर
- MOP - 50 kg प्रति एकर
- K-Mag - 36.5 kg प्रति एकर
- DAP - 18:46:00 - 50 kg प्रति एकर
✅फॉस्फरस हा जमिनीतून कमी प्रमाणात शोषण होतो, त्यामुळे त्याचे प्रमाण जास्त द्यावे. वरील खतांमधून पिकास खालील अन्नद्रव्ये मिळतील.
- नायट्रोजन - 14 kg प्रति एकर
- फॉस्फरस - 36 kg प्रति एकर
- पोटॅश - 56 kg प्रति एकर
- मॅग्नेशियम - 3.5 kg प्रति एकर
- सल्फर - 6.5 kg प्रति एकर
✅वरील अन्नद्रव्ये मिळाल्यामुळे रोप वाढीच्या अवस्थेत रोपांना नवीन पाती निघतात, पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते. मान जाड होण्यास सुरुवात होते,पाती हिरव्यागार होतात.