कांदा रोप लागवडीपूर्वी करायचे खत नियोजन.
Farmspot AgroShare
✅कांदा रोपांच्या वाढीसाठी खालील प्रमाणात मुख्य दुय्यम व प्रमुख सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते.
- नायट्रोजन - 56 kg - 68 kg प्रति एकर
- फॉस्फरस - 24 kg ते 28 kg प्रति एकर
- पोटॅश - 32 kg ते 40 kg प्रति एकर
- कॅल्शियम - 12 kg ते 20 kg प्रति एकर
- मॅग्नेशियम - 4 kg ते 6 kg प्रति एकर
- सल्फर - 10 kg ते 12 kg प्रति एकर
- झिंक - 1 ते 2.2 kg प्रति एकर
- फेरस - 1.6 ते 2.5 kg प्रति एकर
- बोरॉन - 0.5 kg ते 1 kg प्रति एकर
✅कांदा रोपांची लागवड करण्यापूर्वी वरील अन्नद्रव्यांमधील 40% अन्नद्रव्ये द्यायची आहेत. त्यासाठी लागवडीपूर्वीच्या खत नियोजनात खालील खते टाकावीत. परंतु फॉस्फरस हा या अवस्थेत 70% द्यावा. तसेच यामध्ये कोणतीही सूक्ष्म अन्नद्रव्ये घेऊ नयेत.
- Yara Mila Complex - 12:11:18 - 50 kg प्रति एकर
- Urea - 50 kg प्रति एकर
- DAP 18:46:00 - 50 kg प्रति एकर
- ICL Polysulphate - 25 kg प्रति एकर
- Mop - 50 kg प्रति एकर
✅वरील खतांमधून पिकास खालील अन्नद्रव्ये मिळतील.
- नायट्रोजन - 38 kg प्रति एकर
- फॉस्फरस - 28.5 kg प्रति एकर
- पोटॅश - 36.5 kg प्रति एकर
- कॅल्शियम - 4.2 kg प्रति एकर
- मॅग्नेशियम - 1.5 kg प्रति एकर
- सल्फर - 12 kg प्रति एकर
✅वरील अन्नद्रव्ये मिळाल्यामुळे रोपांची रोप रुजण्याच्या अवस्थेत पांढऱ्या मुळांची वाढ तंतुमय होते. नवीन पाती फुटतात व रोपे सेट होतात, तसेच रोपवाढीच्या अवस्थेत वरील अन्नद्रव्यांचा पुरवठा झाल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होते, नवीन पती निघतात, पाती हिरव्यागार होतात व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो.